मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, जळगावातील धक्कादायक प्रकार

गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

  • Published by:  Kiran Pharate
नितीन नंदुरकर, जळगाव 15 ऑगस्ट : आज देशात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यानिमित्नाने सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येत आहे. मात्र, जळगावमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळीच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच एका महिलेनं स्वतःला रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
20 हजाराला दिवसाला 700 रुपयांचं व्याज, 15 सावकारांनी लुटलं, 'शिवराम वडेवाले'च्या मालकाची आत्महत्या जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच महिलेला रोखलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. वंदना सुनील पाटील असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. संबंधित महिला आणि तिच्या पतीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिनाभरापासून उपोषण सुरू होतं. मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने महिलेनं हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या दाम्प्त्याच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केली असल्याचा त्यांचा आरोप आहे. ज्या दिरासोबत केले लग्न, त्यानेच क्षुल्लक कारणावरुन झाडली गोळी अन्... फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ही महिला आणि तिचा पती करत आहे. यासाठी महिन्याभरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे. मात्र, कोणीही दखल न घेतल्याने महिलेनं हे पाऊल उचललं. ध्वजारोहण सोहळ्यावेळीच वंदना पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
First published:

Tags: Gulabrao patil, Shocking news

पुढील बातम्या