जालना, 14 फेब्रुवारी : जालना (jalana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा (deulgaon raja) रोडवरील जामवाडी येथील विहीर "मौत का कुवा" बनली आहे. आज पहाटे पुन्हा एक कार विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका चार वर्षीय मुलीसह महिलेचा मृत्यू झाला आहे.
आज पहाटेच्या सुमारास देऊळगाव राजा रोडवरील जामवाडी शिवारातील विहिरीत एका कार कोसळली होती. कारमधील 3 जण पोहून वर आल्याचे सांगण्यात येत आहे. कारमध्ये एक महिला व मुलगी अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले होते. अखेर अपघातग्रस्त i20 कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. गाडीतील तिघांना जिवंत बाहेर काढले. मात्र, एक महिला आणि 4 वर्षीय मुलीचा याअपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
IND vs ENG : अजिंक्य रहाणेचा स्पेशल विक्रम, विराटलाही जमला नाही
दोन दिवसांपूर्वी भरधाव कारवरुन चालकाचा नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळून कारमधील दोघांना जलसमाधी मिळाल्याची घटना जामवाडी शिवारात घडली होती.
बीडहून बुलढाण्याकडे भरधाव वेगात जात असलेली ब्रीजा सुझुकी एमएच 22, एएम 2701 ही गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे जामवाडी शिवारातील युवराज धाब्यासमोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली. यात कारमधील दोघाना जलसमाधी मिळाली. मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरुन मयताचे नाव अब्दुल मन्नान शेख सगीर रा. बीड असे असून बीडमधील सागर फॅब्रीकेशन या प्रसिद्ध दुकानाचे मालक होते तर दुसऱ्या मयताचे नाव अझहर कुरैशी असे आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या माध्यमातून बचावकार्य केले.
आधी धुर सोडला नंतर अख्खा गिळला, माशाच्या शिकारीचा आतापर्यंत न पाहिलेला VIDEO
बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने जालना- देउलगावराजा वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. रात्रीची वेळ असल्याने अंधार आणि काठोकाठ भरलेल्या विहिरीत ही गाडी पडल्यामुळे जालना पोलिसांना बचावात मोठे अडथळे आले. मध्यरात्री उशिरा दोन्ही प्रेत बाहेर काढण्यात यश आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.