Weather updates : मुंबईसह राज्यात थंडीची चाहूल, तापमानाचा पारा घसरला

Weather updates : मुंबईसह राज्यात थंडीची चाहूल, तापमानाचा पारा घसरला

आठवड्याभरात राज्यात गारवा आणखी वाढण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर: राज्यात आतूरतेनं वाट पाहात असणाऱ्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. राज्यातील ढगाळ वातावरण कमी झालं असून आता थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईसह राज्यातील तापमानात घसरण झाली आहे. आठवड्याभरात राज्यात थंडी येईल असा हवामन विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत दमट, ढगाळ हवामान आणि मध्येच रिमझिम पाऊस अशी स्थिती होती. अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्रीवादळाचा परिणाम झाला होता. त्यामुळे काही ठिकाणी अति उकाडा तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. कोकण किनारपट्टी आणि विदर्भात नोव्हेंबर महिन्याअखेरीस थंडीची चाहूल लागली होती. मुंबईसह इतर भागांमध्ये या आठवड्यात थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या राज्यात सर्वच ठिकाणी कोरडे हवामान होत आहे तर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरू आहे. असं असलं तरीही हा आठवडा हवामान कोरडं राहू शकतं मात्र पुढच्या आठवड्यात राज्यात सर्वदूर गारवा असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. पुढच्या 72 तासांमध्ये राज्यात गारवा आणखी वाढण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागांमध्ये 13 अंश सेल्सियसपर्यंत कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. तर 30 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील पहाटेचे तापमान हे २६ डिग्री पेक्षाही कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

वाचा-हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात करा बदला, आजार पळतील दूर!

दुसरीकडे भुसावळ शहरात आज पाहाटेपासून पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणामध्ये गारठा निर्माण झाला आहे . नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश ठिकाणी रिमझिम पाऊस होता. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही धुळे, जळगाव परिसरात तुफान पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी द्राक्ष आणि संत्र बागांवर मोठा परिणाम झाल्यानं शेतकरी मात्र चिंतेत आहे.

उकाडा आणि पावसानं हैराण झालेले नागरिक थंडीची वाट पाहात होते. राज्यात थंडी येणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. आता राज्यात थंडीची चाहूल लागल्यामुळे काहीसा दिलासा आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोटी पेटवून थंडीचा आनंद लुटतानाही पाहायला मिळत आहे.

वाचा-नको असलेली गर्भधारणा थांबवण्यासाठी कोणते गर्भनिरोधक आहे सगळ्यात बेस्ट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 08:23 AM IST

ताज्या बातम्या