मुंबई, 15 डिसेंबर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत चांगलीच खडाजंगी झाली. पुरवणी मागण्यांवर उत्तर द्यायला उभे राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर भडकल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवार हे विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देत असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत त्यांना हटकलं. यानंतर अजित पवार यांनी आक्रमपणे मुनगंटीवार यांचा समाचार घेतला. 'सुधीर मुनगंटीवार हे बोलत असताना मलाही त्यांना उत्तर देण्याची इच्छा झाली होती. मात्र मी मध्ये बोललो नाही. म्हणजे हे बोलतील ते खरं आणि आम्ही बोलायला उभे राहिलो की गोंधळ होणार,' असं म्हणत अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना उत्तर दिलं.
मंदिरावरून राजकारण आणि केंद्राकडे येणारी GST रक्कम, अजित पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :
- कोरोनामुळे कमी काळाचं अधिवेशन
- विरोधकांनी अशी टीका केली की कोरोना काळात जेवढं लक्ष सरकारने द्यायला हवं होतं तेवढं दिलं गेलं नाही
- कोणीही राज्यकर्ते असले तरीही अशी महासाथ असावी असं वाटणार नाही
- कोरोनाच्या काळात अनेकांनी जीवाची जोखीम पत्करुन काम केलं
- मंदिरं सुरू करण्यासाठी राजकारण केलं
- कोणाला धार्मिक स्थळं उघडायला नाही आवडणार?
- कोरोना रुग्णांना / मृतांच्या नातेवाईकांना सरकारने स्वत:च्या तिजोरीतून मदत केली
- साखर कारखान्यांना परवानगी दिल्यानंतर सॅनिटायझरची किंमत कमी झाली
- जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा ती भागवली गेली पाहिजे
- केंद्राकडून 30 हजार 537 कोटी रुपये येणं बाकी