मुंबई, 30 मार्च : राज्यात कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 220 जणांना कोरोनाची (Covid - 19) लागण झाल्याची माहिती समोर आली असून हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहे. यातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे, त्यानुसार राज्यात पुढील 14 एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी 31 मार्चपर्यंत राज्यात मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता ही तारीख 14 एप्रिलपर्यंत करण्याचे ठरविले आहे.
संबंधित - कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी BMC ची कठोर नियमावली
परिपत्रकानुसार कोरोना व्हायसरच्या प्रसाराचे माध्यम पाहता हा एका रुग्णाकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीस याचा संसर्ग होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पुढील 14 एप्रिलपर्यंत सर्व मद्याची दुकाने बंद राहतील. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून मद्य विक्री सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात होती. मात्र राज्य सरकारने यावर कडक नियमावली केली आहे आणि 14 एप्रिलपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.
संबंधित - मुंबईत लॉकडाऊन अधिक कडक, अनेक भागांमध्ये SRPF च्या तुकड्या तैनात
राज्यात (maharashtra) कोरोनाग्रस्त (coronavirus) रुग्णांच्या मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. तर 19 नवे रुग्ण आढळून आले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा विचार करीत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाव्हायरसचे मुंबईत 8, पुण्यात 5, नागपुरात 2, नाशिक आणि कोल्हापुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. शिवाय आणखी काही रुग्णांचे अहवाल मिळाले नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.