मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमध्ये सुरु होतील वाईन शॉप

राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमध्ये सुरु होतील वाईन शॉप

लॉकडाऊनमध्ये मद्यपींसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट असलेले मुंबई आणि पुणे शहरात उद्यापासून वॉईन शॉप खुले राहणार आहेत

लॉकडाऊनमध्ये मद्यपींसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट असलेले मुंबई आणि पुणे शहरात उद्यापासून वॉईन शॉप खुले राहणार आहेत

लॉकडाऊनमध्ये मद्यपींसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट असलेले मुंबई आणि पुणे शहरात उद्यापासून वॉईन शॉप खुले राहणार आहेत

मुंबई, 3 मे:  राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये मद्यपींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई आणि पुणे शहरात उद्यापासून वाईन शॉप खुले राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव आणि कोविड नियंत्रण कक्ष प्रमुख भूषण गगराणी यांनी दिली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल केले आहेत. रेड झोनमध्ये अत्यावश्यक दुकानाशिवाय इतर दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, पुण्यात वाईन शाॅप सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, सोशल डिसेटन्स नियम आणि पाच लोकांपेक्षा जास्त दुकानात नसतील, याची खबरदारी घेतली जाईल. तसेच स्थानिक पोलिस लक्ष देतील, अशी निर्बंध घालण्यात आली आहेत. रेस्टॉरंट, बार मात्र बंद राहतील. हेही वाचा..'माझ्या गर्लफ्रेंडशी फ्लर्ट केलंस तर..' अनुष्काच्या फॅनला अभिनेत्यानं दिली धमकी रेडझोनमध्ये जीवनावश्यक गोष्टी वगळता कशालाही परवानगी नव्हती. यात आता सरकारने शिथिलता आणली आहे. मात्र, यासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. कंटेनेमेंट एरिया कंस्ट्रकंशन साईट आणि वाईन शॉप बंद राहतील. वाईन शॉपमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. त्याचबरोबर रेड झोनमध्ये सलून कटींग दुकानांना परवानगी नाही. रेड झोन एरियात मोबाईल शॉप्स बंद राहतील. पण ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ईकॉमर्स शॉप, मोबाईल दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. हेही वाचा.. 'त्या' राजकीय नेत्यांवर कारवाई करा, मनसे आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी दरम्यान, या आधी रेडझोनमध्ये जीवनावश्यक गोष्टी वगळता कशलाही परवानगी नव्हती. यात आता सरकारने शिथिलता आणली आहे. मात्र, यासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. अर्थव्यवस्था हळुहळू पूर्ववत करावी लागेल. यासाठी वाईन शॉप उघडण्याची निर्णय घेतला का, यावर जास्त भाष्य करू शकत नसल्याचंही  भूषण गगरानी यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात 14 रेड झोन.. महाराष्ट्रात एकूण 14 रेड झोन, 16 ऑरेंज झोन ​​आणि 6 ग्रीन झोन आहेत. जोपर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये सलग 21 दिवस नव्याने कोरोनाबाधित एकही रुग्ण सापडणार नाही, तोपर्यंत असा जिल्हा ग्रीन झोन मानण्यात येणार नाही, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव प्रीती सुडान यांनी दिली आहे. रेड झोन (Red Zone): - मुंबई (Mumbai) - पुणे (Pune) - ठाणे (Thane) - नाशिक (Nashik) -पालघर (Palghar) - नागपूर (Nagpur) - सोलापूर (Solapur) - यवतमाळ (Yavatmal) - औरंगाबाद (Aurangabad) - सातारा (Satara) - धुळे (Dhule) - अकोला (Akola) - जळगाव (Jalgaon) - मुंबई उपनगर ( Mumbai Suburban) हेही वाचा.. 'या' तारखेपर्यंत कमी होणार कोरोनाचा प्रसार, मराठमोळ्या संशोधकांचा नवा अंदाज ऑरेंज झोन (Orange Zone) ​- रायगड (Raigad) - अहमदनगर (Ahmednagar) - अमरावती (Amravati) - बुलडाणा (Buldhana) - नंदुरबार (Nandurbar) - कोल्हापूर (Kolhapur) - हिंगोली (Hingoli) - रत्नागिरी (Ratnagiri) - जालना (Jalna) - नांदेड (Nanded) - चंद्रपूर (Chandrapur) - परभणी (Parbhani) - सांगली (Sangli) - लातूर (Latur) -भंडारा ( Bhandara) - बीड ( Beed) Green Zone: - उस्मानाबाद (Osmanabad) - वाशिम (Washim) -सिंधूदुर्ग (Sindhudurg) - गोंदिया (Gandia) - गडचिरोली (Gadchiroli) - वर्धा ( Wardha) संपादन- संदीप पारोळेकर
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या