पंढरपूरला वारी जाणार का? अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

कुंभमेळ्याबाबत जे घडलं तसं इथे घडू नये याचीही दक्षता घेणं आवश्यक आहे' अशी चिंता अजित पवार (Ajit pawar) यांनी व्यक्त केली.

कुंभमेळ्याबाबत जे घडलं तसं इथे घडू नये याचीही दक्षता घेणं आवश्यक आहे' अशी चिंता अजित पवार (Ajit pawar) यांनी व्यक्त केली.

  • Share this:
बारामती, 12 जून : राज्यात कोरोनाची (Corona) तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत पंढरपूरची वारी निघणार की नाही, अशी चर्चा रंगली आहे. पण 'राज्य सरकारने सर्व चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून मानाच्या 10 पालख्यांना परवानगी दिली आहे, परंतु सध्याच्या कोरोना सावटाचाही विचार केला पाहिजे. कुंभमेळ्याबाबत जे घडलं तसं इथे घडू नये याचीही दक्षता घेणं आवश्यक आहे' अशी चिंता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी व्यक्त केली. कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्वत्र अटी शिथिल करण्यात आल्या आहे, त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहे. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने वारीबद्दल संपूर्ण खबरदारी घेत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिला आहे. आज बारामतीत अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना अजितदादांनी आपली वारीबद्दल भूमिका स्पष्ट केली. खूशखबर! ही बँक त्यांच्या ग्राहकांना देत आहे मोफत रेशन, वाचा कुणाला मिळतोय लाभ? मागील वर्षी वारीला जसे निर्बंध होते, तसे आता निर्बंध लावलेले नाहीत. सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी सर्वांशी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे.  वाखारीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीसाठीही शिथिलता देण्यात आली आहे, अशी माहिती अजितदादांनी दिली. कुंभमेळ्याबाबत जे घडलं तसं इथे घडू नये याचीही दक्षता घेणं आवश्यक आहे.  परंपरा टिकली पाहिजे यासाठी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय जाहिर केला आहे.  आम्ही वारकरी सांप्रदायाच्या भावनांचा आदर करतो, राज्याचं आरोग्याचं हित याकडेही लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं काही बाबतीत सर्व विचार करुनच निर्णय घ्यावा लागतोय, असंही अजितदादांनी सांगितलं. राज पांडेचा आवाज ऐकून नागपूरकर हळहळले, कुटुंबीयांशी बदल घेण्यासाठी झाली हत्या 'आताही वारकरी सांप्रदायाच्या भावना तीव्र असतील, तर विभागीय आयुक्तांना सुचना देवू.. संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्याबाबत सांगू असंही अजितदादांनी स्पष्ट केलं.
Published by:sachin Salve
First published: