मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'वंचित'ला सोबत घ्यायचं का नाही? महाविकासआघाडीची खलबतं, बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले...

'वंचित'ला सोबत घ्यायचं का नाही? महाविकासआघाडीची खलबतं, बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले...

काहीच वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली, यानंतर आता महाविकासआघाडीच्या नेत्यांचीही बैठक झाली.

काहीच वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली, यानंतर आता महाविकासआघाडीच्या नेत्यांचीही बैठक झाली.

काहीच वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली, यानंतर आता महाविकासआघाडीच्या नेत्यांचीही बैठक झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 डिसेंबर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत चालली आहे. काहीच वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली, यानंतर आता महाविकासआघाडीच्या नेत्यांचीही बैठक झाली, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर महाविकासआघाडीसोबत जाण्यास तयार आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं का नाही, याबाबत महाविकासआघाडीच्या आजच्या बैठकीत चर्चा झाली का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. 'प्रकाश आंबेडकर आणि माझी चर्चा सकारात्मक झाली, यावर काही बारकावे आहेत, त्याबद्दल लवकरच स्पष्ट करू. महाविकासआघाडीमध्ये येण्याची त्यांची मानसिकता आहे, यावर एकत्रित चर्चा करून मार्ग काढू,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीसोबत युती करायला सकारात्मकता दर्शवली आहे. याबाबत महाविकासआघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत शिवसेना नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकासआघाडीचा विराट मोर्चा, उद्धव ठाकरे आक्रमक

महाविकासआघाडीच्या बैठकीला मुहूर्त

दरम्यान महाविकासआघाडीच्या बैठकीला अखेर मुहूर्त लागला. 29 सप्टेंबरला ही बैठक होणार होती, मात्र आता 2 महिने 7 दिवसांनंतर ही बैठक होत आहे. वंचित बहुजन आघाडीबाबतचा निर्णय याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टात सुरू असलेली कायदेशीर लढाईल. केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासावर आक्षेप, राज्यपालांची वक्तव्य, या विषयांवर या बैठकीत चर्चा होत आहे.

नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीतीही महाविकासआघाडीच्या बैठकीमध्ये ठरणार आहे.

राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणार का? अजितदादांनी सांगितली महाविकासआघाडीची रणनीती

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

महाविकासआघाडी सरकार असताना काही घटकांची माझ्याशी चर्चा झाली. तेव्हा महाविकासआघाडी एकत्र राहणार असेल, तर वंचित बहुजन आघाडीचा त्यात कसा समावेश होईल, याचा आराखडा तयार केला आहे का? नाना पटोले स्वतंत्र लढणार असल्याचं बोलत होते, त्यामुळे महाविकासआघाडी म्हणून तुम्ही वंचित बहुजन आघाडीशी स्वतंत्र बोलणार आहात का? असं मी त्यांना विचारलं, या प्रश्नाचं उत्तर अजूनही येत आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. महाविकासआघाडीचं त्यांचा काही ठरत नाही, तोपर्यंत राजकीय चर्चेचं पुढे काही होईल, असं मला दिसत नाही, असं प्रकाश आंबेडकर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

शिवशक्ती-भीमशक्तीसाठी एक पाऊल पुढे, शिवसेनेतून मोठी माहिती समोर

First published:

Tags: Prakash ambedkar, Uddhav Thackeray