मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवार - प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय उलथापालथ होणार? पाहा संजय राऊतांनी काय म्हटलं

शरद पवार - प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय उलथापालथ होणार? पाहा संजय राऊतांनी काय म्हटलं

Sanjay Raut on Sharad Pawar - Prashant Kishor meeting: येत्या काळात राजकीय उलथापालथ होणार का? यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव, 12 जून: शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या भेटीला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) दाखल झाले. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात बराच वेळ चर्चा सुद्धा झाली. मुंबईत झालेल्या या भेटीनंतर संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. येत्या काळात मोठी राजकीय उलथापालथ होणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव येथे संजय राऊत म्हणाले, प्रशांत किशोर हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांनी आमच्यासाठी काम केले आहे, काँग्रेससाठी काम केले आहे. त्यांच्यासोबत अनेक राजकारण्यांच्या भेटी होत असल्या तरी त्या पक्षाच्या विस्ताराच्या संदर्भात होऊ शकतात. त्यामुळे प्रशांत किशोर हे शरद पवार यांना भेटल्याने कोणतीही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही.

भेटीनंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किसोर यांच्याकडे देण्यात आलेली नाहीये. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली.

2024 मध्ये पुन्हा मोदी सरकारच - देवेंद्र फडणवीस

या भेटीवर देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं, भाजप विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी ही बैठक झाली असल्याचं बोललं जात असताना यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, कोणी कोणाला भेटावं यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल यात शंका नाही.

First published:

Tags: Sanjay raut, Sharad pawar