मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्वराज संघटना राजकारणाच्या आखाड्यात उतरणार? संभाजीराजेंनी दिले स्पष्ट उत्तर

स्वराज संघटना राजकारणाच्या आखाड्यात उतरणार? संभाजीराजेंनी दिले स्पष्ट उत्तर

स्वराज्य संघटना तळागाळातील माणसाला ताकत देण्यासाठी तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बळ दिले आम्ही पण गरिबांना बळ देणार आहोत.

स्वराज्य संघटना तळागाळातील माणसाला ताकत देण्यासाठी तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बळ दिले आम्ही पण गरिबांना बळ देणार आहोत.

स्वराज्य संघटना तळागाळातील माणसाला ताकत देण्यासाठी तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बळ दिले आम्ही पण गरिबांना बळ देणार आहोत.

  • Published by:  sachin Salve
औरंगाबाद, 10 ऑगस्ट : स्वराज्य संघटना स्थापन करून आता संभाजीराजे छत्रपती यांनी आता राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. जर सरकारमध्ये प्रश्न सुटत नसतील तर आम्ही सरकारविरोधात उभे राहणार आहोत. गरीब लोकांवर जर अन्याय होणार असेल तर आम्ही कमी पडणार नाही, असा निर्धार संभाजीराजेंनी बोलून दाखवला आहे. तसंच, माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे कुणाला गुवाहाटीला नेऊ शकत नाही, असा टोलाही संभाजीराजेंनी लगावला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजीराजे यांनी महाराष्ट्रात वेळोवेळी आंदोलनं केली. आता संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेतून राजकीय आखाड्यात नशीब आजमावून पाहण्याची तयारी सुरू केली आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडली. स्वराज्य संघटना तळागाळातील माणसाला ताकत देण्यासाठी तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बळ दिले आम्ही पण गरिबांना बळ देणार आहोत. मला माझे संघटन आणि चिन्ह सामान्य लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे. स्वराज्य हे त्यांच्या खंबीरपणे लोकांच्या पाठीशी थांबणार आहे. जर सरकारमध्ये प्रश्न सुटत नसतील तर आम्ही सरकारविरोधात उभे राहणार आहे. गरीब लोकांवर जर अन्याय होणार असेल तर आम्ही कमी पडणार नाही, असं संभाजीराजे म्हणाले. (आम्हाला धोका देणाऱ्यांना आम्ही फोडलं, भाजप नेते सुशील मोदींचं मोठं वक्तव्य) 'आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझे आमरण उपोषण सोडवले. आता ते मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री यांनाही विषय माहीत आहे. आता त्यांच्यावर वेळ आली आहे आश्वासने पूर्ण करण्याची, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला, मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला आहे, काही मत्र्यांना शपथधिली आहे. पण मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यावे हा त्यांचा विषय आहे. चांगले लोक असतांना डागाळलेल्यां लोकांना का घेतलं हा प्रश्न येतो, अशी नाराजीही संभाजीराजेंनी बोलून दाखवली. (नाशिक हादरलं! बाल्कनीत खेळताना अवघ्या 18 महिन्याच्या समृद्धीचा तोल जाऊन मृत्यू) शरद पवार काय बोलले माहीत नाही. पक्ष चिन्ह पळवापळवी यावर मी बोलणार नाही. पण, माझी संघटना मला लोकांपर्यंत पोहोचवयाची आहे. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून लगेच संघटना राजकीय करणे शक्य नाही. मी कुणालाही गुवाहाटीला किंवा काश्मीरला घेऊन जाऊ शकत नाही. पैसे असतील तरच राजकारण शक्य नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.
First published:

पुढील बातम्या