22 जून : शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची मदत करण्यामध्ये ज्या बँका टाळा टाळ करत असतील, त्या बँकाना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय. ते सांगलीत बोलत होते.
कुठली ही बँक अडवणूक करत असेल तर शेतकऱ्यांनी माझ्या नंबरवर किंवा हेल्पलाईननंबर वर किंवा तहसीलदार, जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलंय.
तसंच पुढच्या काळात सहकार विभागावर आणि सहकार क्षेत्रावर शिक्षकांनी विश्वास ठेऊन, सर्व पगार राज्यातील त्या त्या ठिकाणांच्या मध्यवर्ती बँकेकडून करून घ्यावा अशी विनंतीही सुभाष देशमुख यांनी शिक्षकांना केली.