Home /News /maharashtra /

Amravati: 'त्या' दिवशी रवी राणांच्या घरावर शिवसैनिकांकडून दगडफेक? CCTV होतोय व्हायरल

Amravati: 'त्या' दिवशी रवी राणांच्या घरावर शिवसैनिकांकडून दगडफेक? CCTV होतोय व्हायरल

'त्या' दिवशी रवी राणांच्या घरावर शिवसैनिकांकडून दगडफेक? CCTV होतोय व्हायरल

'त्या' दिवशी रवी राणांच्या घरावर शिवसैनिकांकडून दगडफेक? CCTV होतोय व्हायरल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याच्या निर्धारावर ठाम होते. यामुळे शनिवारी मुंबई आणि अमरावतीत शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते.

अमरावती, 26 एप्रिल : शनिवारी (23 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी जाहीर केलं. त्यानंतर राणा दाम्पत्य राहत असलेल्या मुंबईतील खार येथील घराबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. तर तिकडे अमरावतीत सुद्दा राणांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांत झटापटही झाली. त्याच दरम्यान आता एक सीसीटीव्ही (CCTV) जोरदार व्हायरल होत आहे. (Stone pelting cctv goes viral) आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबईत अटक झाल्यानंतर अमरावती येथील राणा यांच्या निवास्थानी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गोळा झाले. राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या. त्यांच वेळी पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात झटापट पहायला मिळाली. त्यांच दरम्यान एका व्यक्ती रवी  राणा यांच्या घरावर दगड मारताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्यक्ती शिवसैनिक असल्याचा दावा राणा कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ आता तूफान व्हायरल होत आहे. त्याच दिवशी रवी राणा यांनी आरोप देखील केला होता की माझ्या घरावर दगडफेक झाली. मात्र तेव्हा दगडफेक झाली नाही असे पोलिसांनी सांगितले होते. पण आता सीसीटीव्ही व्हायरल होत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. राणा दाम्पत्याला आणखी एक झटका, 29 तारखेपर्यंत कारागृहात मुक्काम अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केल्यानंतर कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आज राणा दाम्पत्याकडून मुंबईतील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर सुनावणी सुरू असताना राणा दाम्पत्याचे वकील अ‍ॅड रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीनाला विरोध केला. आधी मॅजिस्ट्रेट कोर्टातून अर्ज मागे घ्यावा नंतर सुनावणी करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. 29 एप्रिलला सरकारी वकील मुंबई सत्र न्यायालयात आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडतील आणि त्यानंतर 29 एप्रिलला जामिन अर्जावर सुनावणी होईल. याआधी वांद्रे न्यायालयातील जामीन अर्ज मागे घ्यावा लागेल तरच सत्र न्यायालयात सुनावणी होईल. दरम्यान आम्ही वांद्रे न्यायालयातील अर्ज मागे घेत आहेत असं राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता 29 एप्रिलपर्यंत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कारागृहातच रहावे लागणार असल्याचं दिसत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Amravati, Navneet Rana, Ravi rana

पुढील बातम्या