Home /News /maharashtra /

Sharad Pawar in Maharashtra : शरद पवारांच्या एंट्रीने बदलणार का महाराष्ट्राचं राजकारण?

Sharad Pawar in Maharashtra : शरद पवारांच्या एंट्रीने बदलणार का महाराष्ट्राचं राजकारण?

महाविकास आघाडीला एकत्र करण्याचे काम खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी केले होते. दरम्यान शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (shiv sena eknath shinde) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  मुंबई 21 जून : मागच्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) सत्ता स्थापन झाली. भाजपला (bjp) सत्तेापासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (shiv sena, ncp, congress) एकत्र एक सत्ता स्थापन केली. या महाविकास आघाडीला एकत्र करण्याचे काम खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी केले होते. दरम्यान शिवसेनेच्या एकनाथ shinde (shiv sena eknath shinde) यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्ष खडबडून जागे झाले आहे. 

  दरम्यान दिल्लीतली बैठक आटोपून शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर पवार मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईत आल्यानंतर आजच रात्री तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील आहेत. यामुळे राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर शरद पवार काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  हे ही वाचा : BREAKING : महाराष्ट्रात संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती राजवट? सूरतमध्ये मोठी घडामोड

  राष्ट्रपती पदासाठी जी बैठक घेण्यात आली होती ती बैठक आटोपून ते तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. ते मुंबईत आल्यानंतर तिन्ही पक्षांची ते बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे. ते मुंबईत आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या दिल्लीत आहेत ते या नाराजी नाट्यावर दिल्लीतून लगेच निघणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक सुरू आहे. ती झाल्यानंतर संध्याकाळच्या दरम्यान तीन्ही पक्षांची बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार सध्यांकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईत दाखल झाल्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यापूर्वी सत्ता स्थापनेवेळी अजीत पवारांनी हे बंड पुकारले होते यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा सरकारवर अशी स्थिती ओढावली आहे.

  हे ही वाचा : 'समजने वाले को इशारा काफी है'; भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

  हे आहेत नॉट रिचेबल आमदार

  एकनाथ शिंदे – कोपरी, अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद, शंभूराज देसाई – पाटण, सातारा, संदीपान भुमरे – पैठण, औरंगाबाद, उदयसिंह राजपूत – कन्नड, औरंगाबाद, भरत गोगावले – महाड, रायगड, नितीन देशमुख – बाळापूर, अकोला, अनिल बाबर – खानापूर,आटपाडी सांगली, विश्वनाथ भोईर – कल्याण(प), संजय गायकवाड - बुलढाणा, संजय रामुलकर - मेहकर, महेश शिंदे – कोरेगाव, सातारा, शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर, प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर, संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ, ज्ञानराज चौघुले – उमरगा, उस्मानाबाद, तानाजी सावंत – पारंडा, उस्मानाबाद, संजय शिरसाट – औरंगाबाद(प), रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद, सुहास कांदे, नांदगाव, नाशिक, बालाजी कल्याणकर , नांदेड उत्तर, शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीण, महेंद्र दळवी, अलिबाग, महेंद्र थोरवे, कर्जत हे आमदारा नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, NCP, Sharad Pawar (Politician), Shiv Sena (Political Party)

  पुढील बातम्या