मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रोहित पवार नामदार होणार का? शरद पवारांच्या उत्तराने कार्यकर्ते अवाक्

रोहित पवार नामदार होणार का? शरद पवारांच्या उत्तराने कार्यकर्ते अवाक्

एका विद्यार्थ्याने शरद पवार यांना प्रश्न विचारला की, रोहित पवार नामदार कधी होणार?

एका विद्यार्थ्याने शरद पवार यांना प्रश्न विचारला की, रोहित पवार नामदार कधी होणार?

एका विद्यार्थ्याने शरद पवार यांना प्रश्न विचारला की, रोहित पवार नामदार कधी होणार?

    पुणे, 04 जून : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) आपली पहिलीच आमदारकीची टर्म गाजवत आहे. पण, त्यांना मंत्रिमंडळात स्थान कधी मिळणार अशी अधूनमधून चर्चा रंगलेले असते. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)  यांना रोहित पवार नामदार कधी होणार असे विचारले असता, मी आमदार झाल्यानंतर 5 वर्ष थांबलो होते, असे उत्तर दिले. त्यामुळे पवारांच्या उत्तरामुळे कार्यकर्तेही अवाक् झाले. पुण्यात पत्रकार  ज्ञानेश महाराव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली यावेळी शरद पवारांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी एका विद्यार्थ्याने शरद पवार यांना प्रश्न विचारला की, रोहित पवार नामदार कधी होणार? यावर पवार म्हणाले की, 'मी 1967 साली विधानसभेत गेलो होतो. मला आमदारांचं नामदार व्हायला 5 वर्ष थांबावी लागले होते' असं सूचक उत्तर पवारांनी दिलं. (JEE Mains: उगाच फॉर्मुले लिहित बसू नका; इथे फॉर्मूल्यांची रेडिमेड List बघा ना) 'गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले होतात. तर बाळासाहेब आज असते तर त्यांनी काय भूमिका घेतली असती, असा सवाल विचारला असता, पवार म्हणाले की, 'जेव्हा जेव्हा crisis तयार होतो, विशेष म्हणजे, राजकीय संघर्ष निर्माण होतो तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरे असते तर काय केलं असतं असा विचार केला की उत्तर सापडतं' भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह यांना तुम्हीच मॅनेज केलं असं म्हणतात?  यावर पवार म्हणाले की,  'ब्रृजभुषण सिंह यांना कुणी मॅनेज करू शकेल असा माणूस नाही. मी मॅनेज केलं हे डोक्यातून काढून टाका' असं पवारांनी उत्तर दिलं. तुमच्यावर लहान नेते टीका करतात तेव्हा काय वाटतं? असं विचारलं असता पवार म्हणाले की, 'सोशल मीडियामध्ये दोन भाग आहे. एक वर्ग असा राज्य राष्ट्र याबद्दल अतीव आस्था आहे, त्यांची नोंद घ्यावी लागते. दुसरे ज्यांच्याकडे mandate आहे, ते वैयक्तिक चिखल फेक करतात त्यांना लोकांमध्ये महत्व मिळत नाही.त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा' (' इतर भाषेतले दिग्दर्शक प्रवीण तरडे सारखे चित्रपट काढा म्हणतील..' गायकाची पोस्ट) तसंच, सध्याचे राज्यकर्ते हे सभ्य सुसंस्कृत राजकारणी नाहीत. नव्या पिढीमध्ये धर्माच्या नावावर द्वेष पसरवण्याचे काम काही लोक करतात पण ते फार काळ टिकत नाही' असंही पवार म्हणाले. गणपती दूध देतो किंवा आंब्यामध्ये काय होत याला अताचे तरुण काडीची ही किंमत देत नाही.खुळचटपणा आहे.   मला सार्वजनिक वाद मान्य नाही ही वैयक्तिक बाब आहे. मी पंढरपूर ला जाऊन विठ्ठलासमोर हात जोडतो. कारण तो देशातल्या गरिबांना त्यांचा संकट मोचक वाटतो त्यांच्या भावनेचा सन्मान म्हणून मी विठ्ठलाला हात जोडतो, असंही पवारांनी आस्तिक-नास्तिक वादावर उत्तर दिलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या