मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंचं भाषण होणार? दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

शिंदेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंचं भाषण होणार? दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याबाबत आता शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 28 सप्टेंबर : शिंदे गटाकडून बीकेसीमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिंदे गटाचे नेते उपस्थित होते. वानखेडे स्टेडियमजवळील गरवारे क्लबमध्ये ही बैठक घेण्यात आली.

शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याबाबत आता शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. इतर पक्षांच्या नेत्यांना बोलावण्याचं कोणतंही नियोजन नाही. हिंदुत्वाचा विचार मानणारे पाहुणे आले तर त्यांचं स्वागत करू, मात्र हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतलेल्यांना स्थान नाही, असं शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा भेट झाली, तेव्हापासून राज ठाकरे दसरा मेळाव्यात भाषण करतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

'दसरा मेळावा उत्साहातच होईल, प्रत्येक विभागाची तयारी सुरू आहे. दसरा विचारांचं सोनं लुटण्याकरता निवडलेला दिवस आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर एकनाथ शिंदे चालत राहिले आहेत. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कारभार सांभाळून लोकांना भेटत आहेत. मंत्रालय तुडूंब भरलेलं असतं,' अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.

दरम्यान दसरा मेळाव्यात आणखी काही जणांचे पक्षप्रवेश होतील, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील, असं सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

'दसरा मेळाव्यासाठी अडीच ते तीन लाख लोक येतील, अशी शक्यता आहे. येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बुक केली आहेत.जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,' अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

First published:

Tags: Cm eknath shinde, Raj Thackeray, Shivsena