मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'राहुल गांधींना घाण्याला जुंपलं पाहिजे', सावरकरांच्या विधानावरून मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं

'राहुल गांधींना घाण्याला जुंपलं पाहिजे', सावरकरांच्या विधानावरून मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं

सावरकर हे देशाचा अभिमान आहे. राहूल गांधी यांना त्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे

सावरकर हे देशाचा अभिमान आहे. राहूल गांधी यांना त्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 मार्च : 'सावरकर हे देशाचा अभिमान आहे. राहूल गांधी यांना त्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या घाण्याला जुंपलं पाहिजे. मग त्यांना कळेल. आज ही ते म्हणाले की माफी मागायाला मी सावरकर आहे का? त्यांना याची शिक्षा पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या सावरकर विधानावरून टीका केली.

'हा कायदा काँग्रेसने केला आहे. त्यानुसार लालू प्रसाद यादव आणि इतर लोकांवर यांची कारवाई झाली. त्यावेळी कोणी निदर्शने केली नाही. त्यावेळी कोणी म्हणाले नाही की लोकशाही धोक्यात आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडला होता. लोकसभेने ती कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. रस्तावर फिरु देणार नाही. ओबीसी समाजाचा अवमान केल्यामुळे त्याचा जाहीर निषेध करतो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवरील कारवाईचं समर्थन करत टीका केली.

काही लोक निलंबन करुन घ्यायला आले होते. यावेळीच कामकाज हे विक्रमी आहे. अध्यक्ष यांचं अभिनंदन आहे. आचारसंहिता जी लावणार आहे ती सगळेच पाळणार आहोत. वेगळे काही स्टंट करायचे असतात. मर्यादा संपल्यानंतर सहन करता येत नाही. एवढ्या दिवस त्यांनी केलं आणि त्याला उत्तर आपल्या लोकांनी केलं तर लोकशाही धोक्यात आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

काम रखडले त्यामुळे १० वर्षे राज्याला मागे नेण्याचे काम केले. बुलेट ट्रेन प्रकल्पात खोडा घातला. आपण या प्रकल्पास गती दिली. बीकेसीत जागा दिली. पंतप्रधानांचे स्वप्न आहे त्यांतील अडथळे दूर केले. वाहतूक यंत्रणा सक्षम करण्याचे राज्याचे धोरण आहे. मुंबईत पुनर्वसनाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कायद्यात बदल करू. मुंबई बाहेर गेलेल्या रहिवाशांना पुन्हा मुंबईत आणू. कोळीवाडे, स्वतंत्र गावठाणे यांचे सीमांकन करणार आहे. खड्डे मुक्त मुंबई करणार आहोत, मुंबईचे गतवैभव मिळवून देणार आहोत, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

(जालन्यात दानवेंना हर्षवर्धन जाधवांचे आव्हान; 'बीआरएस'मध्ये प्रवेश करताच निवडणूक लढवण्याची घोषणा)

कॅगचा अहवाल सादर झाला आहे. भीषण परिस्थिती आहे. जनतेचा पैसा आहे, तो जनतेसाठी वापरला पाहिजे. यामधील गैरव्यवहाराची चौकशी होईल. पोटदुखी उठली आहे, त्यावर पंचामृत दिले आहे, हे थोडे थोडे घ्यायचे असते. एकत्र नाही, त्यात मध असते, जळजळ आणि मळमळ थांबायला पाहिजे, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

(माझं नाव सावरकर नाही ते पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे)

अमित साटम यानी काही कंपन्यांची नाव दिली आहे . त्याची ही योग्य चौकशी केली पाहिजे. आकसापोटी कारवाई करत नाही. मुंबई महानगरपालिका निवडणूक झाली त्याचा मी साक्षीदार होतो. भाजपने कार्यक्रम केला होता पण सरकारमध्ये आपण होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितले की, महापालिकेत कोणाचं काय आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. कोणतीही शर्त न ठेवता तसं त्यानी महापौर दिला. त्याची परतफेड कशी केली माहीत आहे. पाठीत खंजीर खुपसून त्यांनी महाविकास आघाडी सोबत सरकार केलं, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली.

First published:
top videos

    Tags: BJP, Eknath Shinde, Rahul gandhi, Shivsena