राष्ट्रवादी देणार का शिवसेनेला पाठिंबा? शरद पवारांनी केला खुलासा

महाराष्ट्रात सत्तेचा पोरखेळ चाललाय. तो थांबायला हवा. विरोधकाची भूमिका आम्ही चांगली बजावू

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 07:55 PM IST

राष्ट्रवादी देणार का शिवसेनेला पाठिंबा? शरद पवारांनी  केला खुलासा

नाशिक 1 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चेला वेगळं वळण मिळालं. नंतर या भेटीवरूनही शंका उपस्थित करण्यात आली. आता शरद पवार यांनीच या दोनही मुद्यांवर खुलासा केलाय. ते म्हणाले, शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही कारण ते सत्तेत आहेत. महाराष्ट्रात सत्तेचा पोरखेळ चाललाय. तो थांबायला हवा. विरोधकाची भूमिका आम्ही चांगली बजावू असंही त्यांनी स्पष्ट केलं. पवार म्हणाले, माझ्याशी संजय राउत यांची भेट झाली हे खरं आहे. भाजप सेनेला लोकांनी बहुमत दिलं. सत्तेचा उन्माद महाराष्ट्रात चालत नाही.

जय हो...रोहित पवारांसाठी 28 जेसीबींमधून उधळला गुलाल!

सत्ता स्थापनेचा संघर्ष बरा नाही. जनता अडचणीत असतांना असा संघर्ष बरा नाही. लवकरच  राम मंदिर प्रश्नाचा निकाल लागेल. हा सर्वाना आनंद देणारा असेलच असं नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. निकाल लागण्यापूर्वी शासकीय यंत्रणा सतर्क असण्याची गरज आहे असंही ते म्हणाले.

शरद पवार शेतकऱ्याच्या बांधावर

अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, ज्वारी, द्राक्ष, फळांच्या बागा यांचं प्रचंड नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार आज नाशिक जिल्ह्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नाशिक जवळच्या बागलान इथं पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आणि प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पवारांपुढे आपल्या अडचणी मांडल्या. कधी दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, मालाला भाव नाही अशा अस्मानी आणि सुल्तानी संकटात जगायचं कसं असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला. पवारांचा दौरा सुरू असतानाच पाऊस सुरू झाला मात्र पवारांनी दौरा थांबवला नाही.

Loading...

लग्नानंतरच ताटातूट, नागपूरच्या युवकाची पत्नी अडकली पाकिस्तानात

शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. पवार म्हणाले, अतिवृष्टी मुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. द्राक्ष पिकाच मोठं नुकसान झालंय. कर्जाच बोझा कमी करण अवघड आहे.डाळीबं, कांदा, सोयबीन, भात, मका अशा सर्वच पिकांच नुकसान झालंय. शेतकऱ्यांना जगायचं कसं असा प्रश्न कायम आहे. संकटावर मात करू, मात्र तुम्ही धीर सोडू नका.

...तर महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट - मुनगंटीवार

सरकारचं काय होतं माहित नाही. तो पर्यन्त केंद्राची मदत घेऊ कर्ज माफीसाठीही प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं. अनेक ठिकाणी बँका कर्ज देत नाही हा प्रश्न गंभीर आहे मुला बाळाचं भविष्य समोर बघा खाजगी सावकारांच कर्ज फेडण्याच्या मदतीसाठी काही नियम नाही. तुम्ही स्वत:ला सावरा मी मदतीसाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...