मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आगामी निवडणुकांबाबत चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान, युतीबद्दल म्हणाले...

आगामी निवडणुकांबाबत चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान, युतीबद्दल म्हणाले...

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या अटकेमुळे भाजप (bjp) आणि शिवसेनेत (shivsena) संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यामुळे..

  • Published by:  sachin Salve

बुलडाणा, 03 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या अटकेमुळे भाजप आणि शिवसेनेत (shivsena) संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यामुळे 'आता कुणी पायघड्या घातल्या तरीही कोणाबरोबरही युती करणार नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील (chandrakant patil) यांनी आज पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा करत शिवसेनेवर निशाणास साधला.

'अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध', खोट्या शिवभक्त अक्षय बोऱ्हाडेच्या पत्नीचा आरोप

आता कुठल्याही परिस्थितीत युती करणार नाही. जरी कुणी पायघड्या घातल्या तरी भाजप आता स्वतंत्ररित्या आगामी निवडणुका लढवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Heart Attack मुळे दररोज मरताहेत चारातले 3 लोक; धक्कादायक आकडेवारी आली समोर!

तसंच,  मागच्या निवडणुकीत आम्ही युती केली होती. पण, त्यानंतर शिवसेनेनं विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली, त्यामुळे भाजपची फसवणूक झाली, असंही पाटील म्हणाले.

दरम्यान,  ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आमनेसामने आले.

अरे बापरे! गाड्यांसमोर येत 2 सिंहांनी घातली झडप; हायवेवरील शिकारीचा थरारक VIDEO

यावेळी फडणवीस म्हणाले की,  'इम्पेरिकल डाटा तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून मागासवर्ग आयोगाला द्यावे अशी मागणी केली. ती मागणी मान्य केली. हे काम पूर्ण होईपर्यंत निवडणुका घेऊ नये. ज्या तीन ते चार जिल्ह्यात जागा कमी होत आहे, तिथे काय करता येईल याचा विचार करावा चर्चा झाली अंतिम निर्णय झाला नाही', असंही फडणवीस म्हणाले.

केंद्राकडून इम्पेरिकल डाटा मिळावाच, कोर्टात याचिका -भुजबळ  

तर दुसरीकडे, ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी बैठक घेण्यात आली होती. केंद्राचा इम्पेरिकल डाटा मिळावा यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी 23 सप्टेंबर रोजी आहे. तोपर्यंत काय काय करता येईल याबाबत चर्चा झाली.  50 टक्क्याच्या मर्यादेत आरक्षण देऊन निवडणूक घेऊया.  SC, ST आरक्षणाला धक्का न देता 50 टक्क्याच्या आत आरक्षण बसवायचे किंवा राज्य मागासवर्ग आयोगाने इम्पेरिकल डाटा २ ते ३ महिन्यात गोळा करायचा, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी चर्चा झाली, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, चंद्रकांत पाटील, भाजप