मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Rain: मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? अजित पवारांनी म्हटलं....

Maharashtra Rain: मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? अजित पवारांनी म्हटलं....

Ajit Pawar on Maharashtra rain and wet draught: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar on Maharashtra rain and wet draught: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar on Maharashtra rain and wet draught: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 30 सप्टेंबर : मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने (Heavy rainfall in Marathwada) मोठे नुकसान झाले आहे. बळीराजाची संपूर्ण शेतंच्या शेतं उद्धवस्त (Crops damage) झाली आहेत. अतिवृष्टीनंतर ओला दुष्काळ (Wet drought) जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांसोबतच भाजप, मनसेकडून ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीची मदत देण्याची मागणी होत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर (Dycm Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं, विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानाची निश्चित माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणार. अतिवृष्टीसोबतच काही भागात धरणांचे पाणी सोडल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक संकट आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या शेतकरी वर्ग, लोकप्रतिनिधींकडून करण्यात येतात. राज्य सरकारकडे अनेकांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. राज्य सरकार संपूर्ण माहिती गोळा करत आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफचे निकष पाहून मदत करण्याची आमची भूमिका आहे. सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रशासनाला योग्य ते निर्देश देत आहेत.

"राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत द्या" - राज ठाकरेंची मागणी

नुकसानाचा अंदाज घेऊन केंद्राकडे मदतीची मागणी केली जाते. मात्र किती मदत द्यायची हा निर्णय केंद्राचा आहे. काही राज्यांना केंद्राने न मागता हजारो कोटींचे पॅकेज दिले. केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे असल्याने कोणत्याही राज्यासोबत दुजाभाव न करता मदत द्यायला हवी असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहे. मुख्यमंत्री आणि मी स्वतःयावर लक्ष ठेऊन आहोत. पिकविम्याचे पैसे त्यांना कसे देता येतील आम्ही पाहतोय. शेतकऱ्यांच्या क्लिप व्हायरल ही झाल्या होत्या. याबद्दलचे आकडे आले, संपूर्ण माहिती आल्याशिवाय तसा निर्णय घेता येणार नाही. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे काही निकष आहेत असंही अजित पवार म्हणाले.

"शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढू, धीर सोडू नका" मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.

नुकसानीचे पंचनामे सुरू करा

सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका

निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे

First published:

Tags: Ajit pawar, Rain, महाराष्ट्र