मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात दारूची दुकानं, सलून सुरू होतील का? पालिका प्रशासनाने केलं स्पष्ट

पुण्यात दारूची दुकानं, सलून सुरू होतील का? पालिका प्रशासनाने केलं स्पष्ट

 तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन उद्यापासून सुरू होत आहे. परंतु, या तिसऱ्या टप्प्यात काही अटी शिथिल करण्यात आल्या आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन उद्यापासून सुरू होत आहे. परंतु, या तिसऱ्या टप्प्यात काही अटी शिथिल करण्यात आल्या आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन उद्यापासून सुरू होत आहे. परंतु, या तिसऱ्या टप्प्यात काही अटी शिथिल करण्यात आल्या आहे.

पुणे, 03 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन उद्यापासून सुरू होत आहे. परंतु, या तिसऱ्या टप्प्यात काही अटी शिथिल करण्यात आल्या आहे. काही भागात दारूची दुकानं सुरू होणार असल्यामुळे तळीरामांची सोय झाली. परंतु, पुण्यात दारूबंदी कायम असणार आहे, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. 22 मार्चपासून देशात लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांचे प्रचंड हाल झाले. पण, आता तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त नाही, अशा भागात दारूची दुकानं सुरू करण्यास अटी शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. पण, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनबाबत अटी शिथिल करण्याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. हेही वाचा - 'गावात भांडण सुरू झालं आहे', नितेश राणे ठाकरे सरकारवर संतापले केंद्र सरकारने  4 ते 17 मे दरम्यान लॉकडाउन जाहीर केल्यानंतर आणि राज्य सरकारसाठी काही निर्बंध जारी केले आहे.  त्यामुले पुणे शहरात 90 टक्के कारभार सुरू होईल, या आयुक्तांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. पूर्ण पुणे  शहर आणि जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. शहरात अनेक हॉटस्पॉट आहेत आणि कंटेन्मेंट परिसर आहे. त्यामुळे 17 मेपर्यंत कडक निर्बंध असतील, असं पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं. रेड झोनमध्ये दारूची दुकानं, सलून सुरू होतील अशी चर्चा होती. परंतु, पुण्यात लॉकडाउनच्या काळात दारूची दुकानं सुरू होणार नाही, असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा - Alert! देशात नव्या पद्धतीने होतोय सायबर घोटाळा, वाचण्यासाठी हे लक्षात ठेवा पुणे शहर आणि ग्रामीण भागात कंटेन्मेंट झोन अर्थात अतिसंक्रमणशील (सील केलेला भाग ) सोडून इतर ठिकाणी फिजीकल डिस्टसिंग पाळून बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू करता येतील, असं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. पण,  बांधकाम क्षेत्रातही 17 मेपर्यंत कामे सुरू होणार नाहीत, असं आता पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. तसंच, राज्यातील आणि परराज्यातील विद्यार्थी  जे पुण्यात अडकले आहेत. त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जायचं आहे, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली पाहिजे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी याबद्दल निर्णय घेतला तर पालिका प्रशासन याबद्दल विचार करेल,  असंही आयुक्तांनी  म्हटलं आहे. हेही वाचा -...तर आता लॉकडाऊनमध्ये सुरू होणार दारूची ऑनलाइन डिलिव्हरी? वाचा सविस्तर पुण्यात 330 किलोमीटर इतकं प्रतिबंधित क्षेत्र आहे.  या परिसरातील हॉटस्पॉट कमी करून करून 30 किलोमीटर इतकं आणण्याचा प्रयत्न आहे. हे जर शक्य झालं तर 17 मेनंतर टप्प्या-टप्प्याने पुण्यात निर्बंध कमी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रेड झोनमध्ये या गोष्टींवर बंदी - रेड झोनमध्ये सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, टॅक्सी  APP सेवा, आंतर जिल्हा आणि जिल्ह्य़ांतर्गत बससेवा, केशकर्तनालय, स्पा, सलून या सेवांवर बंदी - बिगर जीवनावश्यक सेवा फक्त सकाळी 7 ते संध्या 7 सुरू राहील. गरज भासल्यास जमावबंदी लागू. - सर्व श्रेणींमध्ये 65 वर्षांहून अधिक वयोगटातील मधुमेह वगैरे गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुलांनी घरातच राहणे गरजेचे. - तीनही श्रेणीत बाह्य़रुग्ण विभाग सुरू राहतील. पण, नियंत्रित विभागात मात्र मुभा नाही. - वाइन शॉप्स, पानाची दुकानं फक्त ग्रीन झोनमध्येच उघडली जाणार - खरेदी करताना ग्राहकांनी सहा फुटांचं अंतर राखणं आवश्यक - एकावेळी शॉपमध्ये पाचपेक्षा जास्त लोक नको संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या