मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? दिल्लीच्या बैठकीआधी जयंत पाटलांचे मोठे विधान

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? दिल्लीच्या बैठकीआधी जयंत पाटलांचे मोठे विधान

कुणाला तरी खूश करण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे ते पत्र आहे. यात मी कुणाचे नाव घेणार नाही. त्यामुळे'

कुणाला तरी खूश करण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे ते पत्र आहे. यात मी कुणाचे नाव घेणार नाही. त्यामुळे'

कुणाला तरी खूश करण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे ते पत्र आहे. यात मी कुणाचे नाव घेणार नाही. त्यामुळे'

सांगली, 21 मार्च : मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) य़ांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने (BJP) लावून धरली आहे. पण 'अनिल देशमुख हे चांगले काम करत असून राजीनामा घेण्याचा कोणताही निर्णय नाही' असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  (Jayant Patil) यांनी स्पष्ट केलं आहे.

सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दलचे वृत्त फेटाळून लावले आहे.

'दिल्लीमध्ये शरद पवार यांनी बोलावलेली बैठक ही नियोजित होती. महाराष्ट्रात काहीही झालं की विरोधक सरकार बरखास्त करा अशी मागणी करत असतात. आता ते हळूहळू हास्यास्पद होऊ लागले आहे. अनिल देशमुख चांगले काम करत आहे. त्यांच्या राजीनाम्याबद्दल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. योग्य तो तपास सुरू आहे', असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

31 मार्चपूर्वीच पूर्ण करा ही कामं; 1 एप्रिलपासून नियमांमध्ये असे होणार बदल

'कोण अधिकारी आहे, खोलात जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे कुणी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात कोण जबाबदार आहे, मुंबईमध्ये स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली आहे याचा तपास सुरू आहे. यातूनच परमबीर सिंग यांचे पत्र आले आहे' असंही जयंत पाटील म्हणाले.

तसंच 'कुणाला तरी खूश करण्यासाठी ते पत्र आहे. यात मी कुणाचे नाव घेणार नाही. त्यामुळे एकंदरीत प्रत्येक जण या प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. सचिन वाझे (Sachin vaze) यांना एनआयएने ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर जी माहिती बाहेर येत आहे. ती प्रसारमाध्यमातून दिसत आहे. त्यावरून पोलीस अधिकारीच यामध्ये सहभागी होते असं दिसून आले आहे. त्यामुळे कितीही मोठा अधिकारी असला तरी ते खपवून घेतले जाणार नाही, हे आम्ही ठरवलं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी पाठपुरावा केला आहे, त्यामुळे हे पत्र समोर आले आहे' अशी टीकाही पाटील यांनी केली.

Param Bir Singh Letter: अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत उपस्थित केला सवाल

'जी व्यक्ती 17 वर्ष सेवेत नव्हती. निलंबित होती, त्या काळात ती व्यक्ती कोणत्याही पक्षाला किंवा व्यक्तीला भेटली असेल. पण सचिन वाझे आणि शिवसेना असा संबंध जोडण्याचे कारण नाही. एखादा अधिकारी सेवेत आला की तो महाराष्ट्राचा सेवक होतो. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला सेवेत कुणी घेतली हे आता समोर आले आहे, असंही पाटील म्हणाले.

शरद पवारांनी बोलावली दिल्लीत बैठक

शरद पवार हे दिल्लीच्या (Delhi) दौऱ्यावर आहे. परमबीर सिंग पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी दिल्लीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांना दिल्लीतच बैठकीसाठी बोलावून घेतले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्रिपद बदलण्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होणार असून आज सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे.

First published:

Tags: Jayant patil