शेतकऱ्यांची माफी मागणार का? उत्तर न देता दानवे पत्रकार परिषदेतून उठून गेले!

शेतकऱ्यांची माफी मागणार का? उत्तर न देता दानवे पत्रकार परिषदेतून उठून गेले!

'मोदी सरकारने करण्यात आलेले शेतीविषयक धोरण शेतकरी हिताचे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे'

  • Share this:

औरंगाबाद, 15 डिसेंबर : दिल्लीत कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे (farmers protest) चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असा खळबळनजक आरोप भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केला होता. त्यानंतर आज माध्यमांशी बोलत असता दानवे चक्क पत्रकार परिषद सोडून निघून गेले.

रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी  'मोदी सरकारने करण्यात आलेले  शेतीविषयक धोरण शेतकरी हिताचे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे', असं रावसाहेब दानवे म्हणाले.

कुत्र्यांसाठी चपात्या केल्या नाहीत, म्हणून भावाने सख्ख्या बहिणीला जिवे मारलं

'शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे', असं तुम्ही म्हणाला होता, याबद्दल दानवे यांना विचारले असता दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'मुळात मी हाडाचा शेतकरी आहे. कागदावरचा शेतकरी नाही. मी जनावरं आपल्या हाताने धुतले आहेत. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे' असं दानवे म्हणाले.

त्यानंतर पत्रकारांनी तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागणार का असा प्रश्न विचारता दानवे पत्रकार परिषदेमधून उठून निगून गेले.

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?

'राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC च्या माध्यमातून आधी मुस्लीम बांधवांची दिशाभूल केली पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे कान भरण्याचं काम सुरू आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल' असं सांगून त्यांचे कान भरण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केला आहे.

'जे आंदोलन सुरू आहे ते शेतकर्‍यांचे नाही. चीन आणि पाकिस्तानचा या आंदोलनामागे हात आहे. CAA आणि NRC वरून या पूर्वी मुस्लीम बांधवांना चिथवण्यात आलं. मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले. NRC येत आहे 6 महिन्यात मुस्लिमांना देश सोडावा लागेल असं सांगण्यात आलं होतं मात्र NRC आणि CAA आल्यानंतर कुठल्या मुस्लीम बांधवांना देश सोडवा लागला', असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला.

Published by: sachin Salve
First published: December 15, 2020, 4:46 PM IST

ताज्या बातम्या