महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : भाजपप्रवेश लांबला कारण... नारायण राणेंनी केला मोठा खुलासा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : भाजपप्रवेश लांबला कारण... नारायण राणेंनी केला मोठा खुलासा

भाजप प्रवेशोत्सुक राणे यांना त्यांच्या लांबलेल्या प्रवेशासंदर्भात आणि भाजप- सेना युतीबद्दल विचारलं असता, त्यांनी मोठा खुलासा केला.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 17 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची महाजनादेश यात्रा कोकणात पोहोचली. या यात्रेचं सिंधुदुर्गात Sindhudurg नारायण राणे Narayan rane यांनी स्वागत केलं. भाजप प्रवेशोत्सुक राणे यांना त्यांच्या लांबलेल्या प्रवेशासंदर्भात आणि भाजप- सेना युतीबद्दल विचारलं असता, त्यांनी मोठा खुलासा केला. "मी भाजपत प्रवेश करणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर माझा विश्वास आहे. भाजपच्या तिकिटावरच आमच्या संघटनेचे आमदार लढणार आणि पक्ष विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार", असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

राणे सध्या भाजपने पुरस्कृत केलेले राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा औपचारिक भाजप प्रवेश अद्याप झालेला नाही. दुसरीकडे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढून जिंकून आले होते. ते अजूनही त्याच पक्षात आहेत.

संबंधित - लढत विधानसभेची : कणकवलीचा गड नितेश राणे राखणार का?

अद्याप प्रवेश नाही कारण...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातच पक्षप्रवेश का नाही केला, असं विचारल्यावर राणे म्हणाले, "भाजप प्रवेश मुंबईतच व्हावा, अशी माझी इच्छा आहे. तो लवकरच होईल."

वाचा - काँग्रेसचं 'डिझास्टर मॅनेजमेंट'; या दिग्गज नेत्यांना विधानसभा लढण्याचे आदेश!

शिवसेना- भाजप युती झाली तर सिंधुदुर्गात कुणाला तिकिट मिळणार, काय परिस्थिती असणार यावर बोलताना राणेंनी थेट दावा केला. "सिंधुदुर्गात राणेंचंच पारडं जड असणार.

हेही वाचा - भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार? पाहा SPECIAL REPORT

जिथे मी आहे, तेच पारडं जड आहे. आमचाच आमदार भाजपच्या तिकिटावर लढणार", असं त्यांनी स्पष्ट केलं.

युती झाली तर?

युती झाली तर कणकवलीची जागा कुणाला मिळणार, यावर राणे म्हणाले की, युती झाली किंवा नाही तरी फरक पडत नाही. तो माझा प्रश्न नाही. माझा भाजप प्रवेश नक्की आहे आणि माझे कार्यकर्तेही माझ्याबरोबर पक्षप्रवेश करणार. मी ज्या पक्षात असेन त्याचंच पारडं जड असणार, असाही दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात मात्र उल्लेखही नाही

नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करायला उत्सुक आहेत. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, असंही ते सांगतात. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचं स्वागत राणेंनी केलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गातल्या भाषणात राणेंचा उल्लेखही केला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम अनुल्लेखाने मारलं का अशी चर्चा आता इथे सुरू आहे. मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात राणेंसंदर्भात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण राणेंच्या पक्षप्रवेशाविषयी मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला नाही. दुसरीकडे सिंधुदुर्गात भाजपची बैठक झाली, त्याला तुम्ही का नाही गेलात, असं विचारलं असता नारायण राणे म्हणाले, 'ती फक्त पक्षाची बैठक होती. त्यांनी बोलावलं असतं, तर गेलो असतो.'

--------------------------------------------------------------

VIDEO : शरद पवारांची सोलापुरात तुफान फटकेबाजी

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: September 17, 2019, 6:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading