मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार? देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार? देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

जामनेरमध्ये  गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर काही निवडक आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती.

जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर काही निवडक आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती.

जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर काही निवडक आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती.

इम्तियाज अली, प्रतिनिधी

जामनेर, 13 ऑक्टोबर :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. खडसे यांच्या भूमिकेमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीच्या जाण्याच्या निर्णयावर महत्त्वाचे विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आज जामनेर येथे आले होते. खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर काही निवडक आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली.  जळगावमधील मोजक्याच आमदारांसोबत बऱ्याच वेळही चर्चा सुरू होती. या बैठकीनंतर फडणवीस बाहेर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया...

'एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे, त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे' अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

तसंच, 'एकनाथ खडसे यांच्यासोबत आज कोणतीही चर्चा झाली नाही. योग्यवेळी मी चर्चा करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की, खडसे हे योग्य निर्णय घेतील' असंही फडणवीस म्हणाले.

आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना खरमरीत पत्र

तर दुसरीकडे जामनेरमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर खडसे समर्थक आक्रमक झाले आहे. खडसे समर्थकांनी सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांचा फोटो व्हायरल करत 'आमचा नेता आमचा अभिमान' अशाप्रकारे एकनाथ खडसे यांना समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे जळगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी?

विशेष म्हणजे, एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज होते. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.  परंतु, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबद्दल वृत फेटाळले होते.  मात्र, आता  एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार  आहे.

रिक्षाचालक बेशुद्ध झाला तरी त्याला फरफटत नेलं, अमानुष मारहाण प्रकरणी दोघांना अटक

राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.  एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे.  खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्र मधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.

First published:

Tags: BJP, Eknath khadse, NCP