मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ खडसेंची होणार का घरवापसी? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं...

एकनाथ खडसेंची होणार का घरवापसी? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं...'नाथाभाऊंचे जाणे दुःखद होते. एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. पण,

'नाथाभाऊंचे जाणे दुःखद होते. एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. पण,

'नाथाभाऊंचे जाणे दुःखद होते. एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. पण,

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India
  • Published by:  sachin Salve

सांगोला, 03 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. पण, 'एकनाथ खडसे यांचा पुन्हा भाजप प्रवेश होणे. हा काही सोपा विषय नाही' असं सांगत एकनाथ खडसेंची घरवापसी कठीण असल्याचे भाजपचे नेते आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगोला दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.

'नाथाभाऊंचे जाणे दुःखद होते. एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. पण, एकनाथ खडसे यांचा पुन्हा भाजप प्रवेश होणे. हा काही सोपा विषय नाही. नाथाभाऊंचा पक्ष सोडण्याच्या कारणावर आधी चर्चा होईल. मगच निर्णय होऊ शकतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

(...तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईल, नारायण राणेंचं मोठं विधान)

'सरकार येईल हा अजित पवारांचा आशावाद चांगला तो ठेवावाच लागतो. ठाकरे, राष्ट्रवादीला अस्तित्व ठेवण्यासाठी एकत्र यावे लागेल. शिवसेनेच्या पाठीशी अदृश्य हात कुणाचे हे सांगितले हे रोहित पवारांनीच सांगितले आहे.

'देशाला तोडण्यासाठी ज्या शक्ती हातात हात घालून काम करतात हे नक्षलवाद्यांच्या समर्थनावरून स्पष्ट झाले. 5 हजार वर्षे झाले हिंदुत्व संपवण्याचा डाव सुरू, अशी टीकाही पाटील यांनी केली.

(खडसेंची होणार घरवापसी? फडणवीसांच्या कानात काही तरी म्हणाले, महाजनांचा मोठा गौप्यस्फोट)

दरम्यान, 'गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यावेळी एकदा भेटूया, सगळं मिटवून टाकू, असा खुलासा महाजन यांनी केला होता. पण, मी अशी कोणतीही मागणी फडणवीस यांच्याकडे केली नव्हती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

First published: