देवेंद्र फडणवीस प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का? – जयंत पाटील

देवेंद्र फडणवीस प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का? – जयंत पाटील

Prakash Mehta : प्रकाश मेहता प्रकरणात आता विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जून : ताडदेव मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनी ताशेरे ओढले. त्यानंतर विरोधकांनी आता सरकारला लक्ष्य केलं आहे. आता मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. SRA घोटाळ्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता दोषी असल्याचा अहवाल लोकायुक्तांनी दिला. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी आक्रमक होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहतांना चौकशीपूर्वी क्लीन चीट दिली होती. पण, चौकशीअंती सर्व सत्य समोर आलं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ताडदेव मिल कंपाऊंडमध्ये एसआरएला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांच्याकडून मारण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणाच्या सुनावणीत अनेक साक्षी तपासल्या गेल्या. त्यानंतर प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांकडून ताशेरे ओढण्यात आले आहेत.

फडणवीसांच्या मंत्र्यावर ताशेरे, अधिवेशनाआधी भाजपच्या अडचणी वाढल्या

विरोधकांचा हल्लाबोल, सरकारच्या अडचणीत भर

ताडदेवमधील मिल कंपाऊंड प्रकरणी लोकायुक्तांनी ओढलेल्या ताशेऱ्यांनंतर प्रकाश महेता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मंत्र्यांनी आता जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी,' असा घणाघातही धनंजय मुंडे यांनी केला आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी प्रकाश मेहतांनी घेतलेल्या निर्णयावर लोकायुक्तांचा अहवाल समोर आला. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजणार आहे. लोकायुक्तांच्या अहवालानंतर आता विरोधक सरकारवर टीकास्त्र डागताना दिसत आहेत.

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलचे दर वाढणार? यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 6, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading