Home /News /maharashtra /

फडणवीसांची उपस्थिती असणाऱ्या कार्यक्रमाला खडसेही येणार? गिरीश महाजनांनी दिलं फोनवरून निमंत्रण

फडणवीसांची उपस्थिती असणाऱ्या कार्यक्रमाला खडसेही येणार? गिरीश महाजनांनी दिलं फोनवरून निमंत्रण

या कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना फोनवर निमंत्रण दिले असल्याची माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

जळगाव, 12 ऑक्टोबर : जामनेर तालुक्यातील नागरिकांसाठी भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज असलेल्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टीपर्पज हॉस्पिटलचे उद्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना फोनवर निमंत्रण दिले असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे या कार्यक्रमास खडसे उपस्थित राहणार का, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.                                              भारतीय जनता पक्षातर्फे आज महिला आघाडीतर्फे राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश महाजन उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील शासन निष्क्रिय झाले आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ आज पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले. जळगाव येथेही गिरीश महाजन आणि खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले या बाबत आपल्याला काहीही माहिती नाही. परवा मुंबईत पक्षाची प्रदेश बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे ते पक्ष सोडून जातील असे आपणास वाटत नाही. तसंच आपण स्वतः खडसे यांच्याशी फोनवर बोलणे करून त्यांना निमंत्रण दिले आहे. या शिवाय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तसेच सर्व पक्षाचे आमदार नेते यांना आपण निमंत्रण दिले आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. एकनाथराव खडसे यांनी पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे त्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार काय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath khadse

पुढील बातम्या