मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BJP-MNS युती होणार? भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलं मोठं विधान

BJP-MNS युती होणार? भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलं मोठं विधान

BJP-MNS युती होणार? भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलं मोठं विधान

BJP-MNS युती होणार? भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलं मोठं विधान

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांत भाजप आणि मनसे यांच्यात युती होणार का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 10 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जोरदार टीका केली आणि भाजप संदर्भात सॉफ्ट कॉर्नर दिसून आला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. यामुळे भाजप-मनसे युतीच्या (BJP MNS Yuti) चर्चांना आणखीनच बळकटी आली. त्यातच आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी युती संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. वेळ जवळच आहे... आता काही फार दिवस नाहीत, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजनांनी दिले मनसे सोबतच्या युतीचे संकेत देणारी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर गिरीश महाजन यांनी पुढे म्हटलं, राज ठाकरे यासंदर्भात बोलल्यानंतरच आपल्याला कळेल, त्यांच्या मनात काय आहे आणि ते काय बोलणार आहेत, हे आम्ही सांगू शकत नाहीत. पण 'वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत', बघूया. रावसाहेब दानवेंनी घेतली राज ठाकरेंची भेट केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी काल (9 एप्रिल) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी रावसाहेब दानवे यांच्यासोबत भाजपच्या नेत्या शायना एनसी या सुद्धा उपस्थित होत्या. नितीन गडकरी आणि राज ठाकरेंच्या भेटीत काय झाली होती चर्चा? नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. ही भेट घेतल्यावर नितीन गडकरी यांनी म्हटलं, "माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावलं होतं." नितीन गडकरी पुढे म्हणाले, "परवा ह्रदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही." दोन नेत्यांमध्ये जवळपास दोन तास बैठक होते. स्वाभाविकच या भेटीत राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांनी जरी ही राजकीय भेट नाही असं म्हटलं असलं तरी, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चा रंगत असून या भेटीलाही महत्त्व प्राप्त झालं आहे.
First published:

Tags: BJP, Girish mahajan, Jalgaon, MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या