• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही', सेनेच्या मंत्र्यांसमोरच थेट इशारा

'नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही', सेनेच्या मंत्र्यांसमोरच थेट इशारा

आज मंत्री संदीपन भुमरे यांच्या मार्गदर्शन खाली बीडच्या शासकीय विश्राम येते शिवसेनेची बैठक झाली.

  • Share this:
  बीड, 28 ऑगस्ट : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांचा बदल कोणी चुकीचे बोलत असेल तर आम्ही सहन करणारे शिवसैनिक (shivsena) नाहीत. त्यामुळे येत्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayana rane) यांच्या दोनी मुलांना मारणार असण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर (ganesh varkar) यांनी दिला. आज मंत्री संदीपन भुमरे यांच्या मार्गदर्शन खाली बीडच्या शासकीय विश्राम येते शिवसेनेची बैठक झाली. यावेळी, राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोरच गणेश वरेकर यांनी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप केला. 'जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी फक्त पैसे कमवण्यामध्येच व्यस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात राणेंच्या विरोधी आंदोलनात पदाधिकारी उपस्थित नव्हते मात्र आम्ही उद्धव ठाकरेसाहेब यांची बदनामी सहन करणार नाहीत आणि येत्या काळात नारायण राणे यांच्या दोनी मुलांना मारणार असल्याचे वक्तव्य केले. टीव्ही का चालू ठेवला, एका कारणावरून पतीने पत्नीचा आवळला गळा या बैठकीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेचा वाटा मिळत नाही. केला दोन वर्षात एकही नारळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उठला नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जर शिवसेनेला काहीच मिळत नसेल तर दुर्दैव आहे, आता यासंदर्भात तुम्हीच काहीतरी करा असं देखील साकडं शिवसैनिकांनी संदीपान भुमरे यांना घातलं. VIDEO: छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी, अपहरणाचा संशय बीडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अंतर्गत कुरबुर सुरू असल्याचे दिसून येत आहे. एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर विकास कामे द्या, म्हणजे लोकांना विकास केला हे सांगता येईल, असं देखील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published: