गेला नवरा कुणीकडे? अमेरिकेतील पतीसाठी मराठी महिलेने केलं असं आंदोलन

गेला नवरा कुणीकडे? अमेरिकेतील पतीसाठी मराठी महिलेने केलं असं आंदोलन

आंदोलन करणाऱ्या महिलांनी ‘अमेरिकेतून येत कसा नाही, आलाच पाहिजे’चे पोस्टर हातात घेतले आहे

  • Share this:

औरंगाबाद, 15 जानेवारी : न्याय मिळावा यासाठी लोक आंदोलन करतात हे आपल्याला माहीत आहे. मात्र औरंगाबादमधील एका महिलेने थेट आपल्या नवऱ्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. सध्या औरंगाबाद परिसरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. विशेष म्हणजे या महिलेसोबत तिचे संपूर्ण कुटुंब आंदोलनात सहभागी झाले आहे. ही महिला सासरच्या दारातच आंदोलन करीत असून पोस्टरबाजी व घोषणाबाजी करीत न्यायाची मागणी करीत आहे.

‘अमेरिकेतून येत कसा नाही, आलाच पाहिजे’चे पोस्टर घेऊन या महिलेचे कुटुंबीय आंदोलनात उतरले आहे. आपला पती अमेरिकेहून येत नाही म्हणून तिने थेट आंदोलन पुकारलं आहे. प्राजक्ता डहाळे असं या महिलेचं नाव आहे. पतीला वारंवार विनंती करुन तो परत घरी येत नाही. म्हणून मी आंदोलन करीत असल्याचे प्राजक्ता सांगते. या प्रकरणात सासरच्यांकडून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्राजक्ताचे म्हणणे आहे. त्यामुळे मला पोलीस संरक्षण द्यावं आणि पती लवकरात लवकर भारतात यावा यासाठी मदत करावी, अशी विनंती प्राजक्ता करीत आहे.

सध्या या महिलेने उपोषण मागे घेतले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या पतीला तातडीने औरंगाबाद येथे बोलावून यावर तोडगा काढता येऊ शकेल. तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही कुटुंबांशी चर्चा करुन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे. तरी १३ फेब्रुवारी मुलगा भारतात परत येईल, असं सासरच्या मंडळींनी सांगितलं आहे.

Published by: Suraj Yadav
First published: January 15, 2020, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading