KDMC च्या शिवसेना नगरसेविकेच्या कन्येची घरगुती वादातून पतीनेच केली हत्या

KDMC च्या शिवसेना नगरसेविकेच्या कन्येची घरगुती वादातून पतीनेच केली हत्या

घरगुती वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना कल्याणच्या मलंगगड परिसरातील वाडी गावात घडली आहे. मृत महिला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) शिवसेना नगरसेविकेची कन्या होती.

  • Share this:

प्रदीप भणगे, (प्रतिनिधी)

कल्याण, 20 जुलै- घरगुती वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना कल्याणच्या मलंगगड परिसरातील वाडी गावात घडली आहे. मृत महिला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) शिवसेना नगरसेविकेची कन्या होती. राज पाटील असे आरोपी पतीचे तर वैशाली पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. वैशाली ही केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका विमल भोईर यांची कन्या होती.

वाडी गावात राहणाऱ्या राज पाटील याचे दहा वर्षांपूर्वी उल्हासनगरच्या माणेरे गावात राहणाऱ्या वैशाली भोईरसोबत लग्न झाले होते. मात्र, पत्नी आवडत नसल्याने राज याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यातूनच शु्क्रवारी संध्याकाळी राज याने धारदार शस्त्राने वैशालीची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली.

हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वैशालीचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे मलंगगड परिसरात तणाव काळी काळ तणाव पसरला होता.

लॉजमध्ये तरुणीची हत्या करून तरुणाने लावला गळफास

कल्याणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे, तरुणीची हत्या करून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्ट हाऊसमध्ये शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारस ही घटना उघडकीस आली. प्रतिमा प्रसाद (वय-20, रा. मुंबई) असे मृत तरुणीचे तर अरुण गुप्ता (वय-20,रा.आजमगड) तरुणाचे नाव आहे. लॉजमध्ये एकाच रूममध्ये दोघे मृतावस्थेत आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रतिभाची हत्या करून अरुणने गळफास लावून आत्महत्या केली पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या, पाहा VIDEO

First published: July 20, 2019, 4:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading