पत्नीचे गावाकडे होते अनैतिक संबंध, पतीनं असा काढला काटा...

पत्नीचे गावाकडे होते अनैतिक संबंध, पतीनं असा काढला काटा...

झारखंड येथे पत्नीची गळा दाबून हत्या करून उल्हासनगर येथे पळून आलेल्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

उल्हासनगर, 16 मार्च:झारखंड येथे पत्नीची गळा दाबून हत्या करून उल्हासनगर येथे पळून आलेल्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीचे गावाकडे अनैतिक संबंध असल्याच्या आरोपीला संशय होता. यावरुन त्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे झारखंडमध्ये 9 मार्चला ही हत्या करण्यात आली होती. हत्या करून आरोपी पती उल्हासनगरला आला असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा..मुलीला पळवलं म्हणून औरंगाबादेत तरुणाचं मुंडकं तलवारीनं छाटून धडापासून केलं वेगळं

झारखंडमधील धुमका जिल्ह्यातील मषांनजोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीमा शेख आणि जुबेर शेख हे पती-पत्नी राहतात. जुबेर आणि सीमाचे दीड वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर जुबेर सीमाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. अखेर 9 मार्चला त्याने या संशयातूनच सीमाची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर कारवाईपासून वाचण्यासाठी तो मुंबईला पळून आला. त्यानंतर तो उल्हासनगरमध्ये आपल्या एका ओळखीच्या व्यतिकडे येणार होता. याच दरम्यान उल्हासनगर एक नंबर पोलिसांना गोपनिय माहितीच्या आधारे झारखंडचा आरोपी जुबेर हा उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच हा आरोपी पळून जाण्याच्या तयारीतही असल्याचे समजले.

हेही वाचा..दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवलं, हत्येनंतर डोकं कापून नदी फेकलं

उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी तात्काळ पथक तयार करून शहाड फाटक येथून रेल्वे स्टेशनकडे जात असताना जुबेरला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जुबेर सफिजुल शेख असल्याचे सांगितले. जुबेरकडे अधिक चौकशी केली असता त्याने 9 मार्चला पत्नी सीमाची गळा दाबून हत्या केल्याचे कबूल केले. आता आरोपी जुबेरचा ताबा घेण्यासाठी झारखंड पोलिस उल्हासनगरला येणार असून उल्हासनगर पोलीस आरोपीला त्यांच्या स्वाधीन करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले.

First published: March 16, 2020, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading