संदीप राजगोळकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 13 मार्च : सासूच्या निधनाचा धक्का बसल्याने सूनेने आत्महत्या केल्याची बातमी काही दिवसांआधी तुम्ही पाहिली असेल. पण त्यात आता एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. सासूच्या जाण्याने सुनेला धक्का नाही तर आनंद झाला. त्यामुळे रागात येत नवऱ्याने तिची हत्या केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
कोल्हापूरच्या आपटे नगरमध्ये हा प्रकार घडला होता.
आजारपणामुळे सासूचं निधन झालं. पण यामुळे सूनेला मोठा धक्का बसला आणि त्यात तिनेही आत्महत्या केली असल्याची बातमी समोर आली होती. पण यात हा हत्येचा बनाव असल्याचं पोलीस तपासात समोर आला आहे.
आईच्या जाण्याने पत्नीला आनंद झाला. याचा पतीला संताप आला आणि त्याने तिची हत्या केली. पण हे सगळं प्रकरण लपण्यासाठी पत्नीने आत्महत्या केली असल्याचा बनाव त्याने रचला. यानंतर पती संदीप लोखंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मालती मधुकर लोखंडे असं सासूचं नाव आहे तर शुभांगी संदीप लोखंडे असं सुनेचं नाव आहे. 70 वर्षांच्या मालती या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. यात त्यांचं शनिवारी सकाळच्या सुमारास निधन झालं. सासूच्या जाण्यामुळे शुभांगी आनंदी झाल्या. हे पती संदीपला सहन झालं नाही आणि त्याने शुभांगीची हत्या केली.
या सगळ्या संशयास्पद प्रकरणाचा पोलीस अधिक तपास घेत होते. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच आपणच पत्नीची हत्या केली असल्याची कबुली संदीपने दिली. तर तिने आत्महत्या केली असल्याचा बनाव रचल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी संदीपला अटक केली आहे.
खरंतर नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. शुभांगी यांच्या जाण्यानं त्यांची दोन मुलं आता पोरकी झाली आहेत पण सासू-सुनेच्या वादात अशी हत्या होणं निश्चितच समाजासाठी भूषणावह नाही. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही घटना आहे. आपल्याच घराच्या दुसऱ्या मजल्यावरून स्वतःच्याच पत्नीला ढकलून देणाऱ्या संदीप लोखंडे याला आता कठोर शिक्षा होईल, मात्र शुभांगीच्या जाण्याने ते कुटुंब उद्ध्वस्त झालं हे मात्र नक्की...
VIDEO : आधी देवीचं दर्शन, पार्थ पवार पोहोचले कार्ला गडावर!