बीड, 17 जानेवारी : सासरी गेल्यावर जावायचा मान असतो, पण सासरी आपल्या पत्नी आणि माहेरच्या लोकांनी अपमान केला म्हणून व्यथित झालेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या ( committed suicide) केल्याची धक्कादायक घटना बीड (beed) जिल्ह्यातील माजलगावात घडली आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव इथं ही घटना उघडकीस आली आहे. अनिल उत्तम थोरात असं या मृत तरुणाचे नाव आहे. अनिल थोरात हा ऊसतोड कामगार होता. त्याने आज आपल्या राहत्या घरात साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
(मस्तच! 'हा' स्टॉक ठरला मल्टिबॅगर; एक लाख रुपयांचे झाले 15 लाख)
अनिल आणि त्याच्या पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. अनिल थोरात आपल्या पत्नीच्या माहेरी गेला होता. तेव्हा पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केला. एवढंच नाहीतर अनिलविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला होता. दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झाल्यामुळे अनिलने टोकाचे पाऊल उचलले. घरी आल्यावर त्याने बायकोच्या साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
याप्रकरणी अनिल थोरातची आई महानंदा उत्तम थोरात यांच्या फिर्यादीवरून पत्नी छाया, तिचा मामा विजू आत्माराम क्षीरसागर, चुलता भाऊ राहुल क्षीरसागर आणि सासू संगीता अंकुश भिसे या चौघांवर माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
भावाच्या डोळ्यादेखत 9 जणांनी केली तरुणाची हत्या
दरम्यान, औरंगाबादेतील (Aurangabad) मिसारवाडी येथे हत्येची थरारक घटना घडली आहे. येथील नऊ जणांच्या टोळीनं एका 25 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे. आरोपींनी धारदार चाकुने तब्बल 36 वेळा वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, यामध्ये संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. परिसरातील भाईगिरीचे वर्चस्व आणि जुन्या वादाच्या कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
(माझी तुझी रेशीमगाठ फेम नेहाची रिअल लाईफ नवऱ्यााठी खास पोस्ट चर्चेत)
या प्रकरणी मृताच्या भावानं सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नऊ जणांविरोधात हत्येचा गुन्हा (FIR lodged) दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास जिन्सी, गुन्हे शाखा आणि सिडको पोलीस संयुक्तपणे करत आहेत. हत्येची घटना घडल्यानंतर रविवारी दिवसभरात पोलिसांनी चार आरोपींना अटक (4 accused arrested) केली आहे. अन्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.