मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पत्नीने पतीला डोळ्यादेखत करायला लावला अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार, वर्ध्यातील घटना

पत्नीने पतीला डोळ्यादेखत करायला लावला अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार, वर्ध्यातील घटना

या महिलेने पीडितेला 'तू माझ्या पतीसोबत लग्न कर', असे म्हणत घराचा दरवाजा बंद करून घराबाहेर निघून गेली. दरम्यान आरोपी पतीने पीडितावर अत्याचार केला

या महिलेने पीडितेला 'तू माझ्या पतीसोबत लग्न कर', असे म्हणत घराचा दरवाजा बंद करून घराबाहेर निघून गेली. दरम्यान आरोपी पतीने पीडितावर अत्याचार केला

या महिलेने पीडितेला 'तू माझ्या पतीसोबत लग्न कर', असे म्हणत घराचा दरवाजा बंद करून घराबाहेर निघून गेली. दरम्यान आरोपी पतीने पीडितावर अत्याचार केला

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 27 डिसेंबर :  संशयीचे भूत जर मानुगटीवर बसले तर माणूस कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. नवऱ्यावर संशय घेणाऱ्या एका पत्नीने (wife) थेट आपल्या पतीला गावातीलच एका 14 वर्षीय मुलीवर डोळ्यादेखत बळजबरीने बलात्कार (rape) करावयास लावल्याची धक्कादायक घटना  वर्ध्यात (wardha) उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून आरोपी दाम्पत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटोडा (बेनोडा) येथे अल्पवयीन पीडिता ही घरी एकटी हजर असताना आरोपी महिलेने तिला घरी बोलावले. पीडिता ही आरोपीच्या घरी येताच आरोपी महिलेने तिला 'तू माझ्या पतीसोबत लग्न कर', असे म्हणत घराचा दरवाजा बंद करून घराबाहेर निघून गेली. दरम्यान आरोपी पुरुषाने पीडिता ही एकटी असल्याचे हेरून तिच्यावर जबरी बलात्कार केला. काही वेळानंतर आरोपी पत्नी घरी परतली. त्यानंतर तिने पतीला पीडितेवर तिच्या डोळ्यासमोरच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करावयास लावले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी सदर प्रकराची माहिती कुणाला दिल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी पीडितेला दिली.

(हेही वाचा - आमिरची मुलगी ईराने BFला KISS करतानाचा फोटो केला शेअर, युझर्स म्हणाले...)

आरेापींच्या तावडीतून कशीबशी सुटका केलेल्या पीडितेने घरी पोहोचल्यावर संपूर्ण प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पीडिता व तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनीही आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसंच भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारचा गुन्हा पत्नीने आपल्या पतीला करायला लावल्याने खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू आहे.

(Flipkart Year End Sale: लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतेय भरघोस सूट; लगेच करा ऑर्डर)

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपी दाम्पत्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ तसंच भादंविच्या कलम ३७६ (३), ७६ (२) (एन), ३६६ (अ.), ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Rape, Wife