मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवी मुंबईत मनसेच्या गोटात खळबळ, गजानन काळेंवर पत्नीकडून गुन्हा दाखल

नवी मुंबईत मनसेच्या गोटात खळबळ, गजानन काळेंवर पत्नीकडून गुन्हा दाखल

गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा FIR मध्ये उल्लेख आहे.

गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा FIR मध्ये उल्लेख आहे.

गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा FIR मध्ये उल्लेख आहे.

नवी मुंबई, 11 ऑगस्ट : नवी मुंबई (navi mumbai) मनसे (mns) शहर अध्यक्ष गजानन काळे (gajanan kale) यांच्यावर त्यांच्याच पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत आणि मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन काळे यांची पत्नीने नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा FIR मध्ये उल्लेख  आहे.

नदीच्या बाजूला आढळला 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह अन् काळी जादू करणाऱ्या वस्तू!

एवढंच नाहीतर गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचंही FIR मध्ये उल्लेख केला आहे. तसंच, २००८ मध्ये आमचं लग्न झालं.  लग्नानंतर 15 दिवसांनी गजानन माझासोबत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सापळा रंग व माझी जात कारणावरून मला टोमणे मारू लागला, जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तो मला बोलला की, तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही असे बोलला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यावेळी गजानन याने मला मारहाण केली होती' असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना एफआयआरमध्ये सांगितलं आहे.

'बनारसी शालू'चा का आहे एवढा भाव? या कारणामुळे किंमत असते लाखोंच्या घरात

'गजानन याचे परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असायचे, त्याचा फोन मी पहिला असता फोन कॉल व मेसेज वरून मला समजायचे की, तो अनेक मुलीशी प्रेमाच्या अश्लील गोष्टी करत असायचा. त्यावेळी मी त्याला तुझे वागणे चुकीचे आहे असे बोलून वाचार समजावून सांगायचे परंतु तो मला सांगायचा की माझ्या पत्रकार मैत्रिणी आहेत तू लक्ष देवू नको असे बोलून माझ्याशी भांडण करायचा आणि मारहाण करायचा' असा आरोपही त्यांच्या पत्नीने केला. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. अद्याप गजानन काळे यांना अटक करण्यात आली नाही.

First published: