पत्नी शौचालयाचा वापर करत नाही म्हणून पतीने केली तक्रार

पत्नी शौचालयाचा वापर करत नाही म्हणून पतीने केली तक्रार

श्रीराम साबळे या पतीने आपली पत्नी द्वारका साबळे घरातल्या शौचालयाचा वापर करत नाही म्हणून थेट प्रशासन दरबारी धाव घेतली आहे.

  • Share this:

वाशिम,30 जुलै: पती-पत्नीची भांडणं काही नवीन नाहीत. अनेकदा पती पत्नीतले भांडण- तंटे कोर्टातही जातात. पण स्वत:ची पत्नी घरी असलेल्या शौचालयचा वापर न करता बाहेर उघड्यावर जात असल्याची तक्रार एका पतीने केल्याची घटना घडली  आहे.

ही घटना आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातली. श्रीराम साबळे या पतीने आपली पत्नी द्वारका साबळे घरातल्या शौचालयाचा वापर करत नाही म्हणून थेट प्रशासन दरबारी धाव घेतली आहे. आता प्रशासनानेच काहीतरी कारवाई करावी असं निवेदनही त्याने प्रशासनाला केलं आहे.

याच वाशिम जिल्ह्यात घरात शौचालय बांधता यावं म्हणून संगीता आव्हाळे नावाच्या महिलेनं आपलं मंगळसूत्र गहाण ठेवल्याचीही  घटनाही घडली होती.

First published: July 30, 2017, 11:23 AM IST

ताज्या बातम्या