दिव्यांग महिलेच्या खून प्रकरणाचा लागला छडा, आरोपीचे नाव ऐकून पोलीसही गोंधळ!

दिव्यांग महिलेच्या खून प्रकरणाचा लागला छडा, आरोपीचे नाव ऐकून पोलीसही गोंधळ!

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यानातर्गत खेर्डा या गावात ५० वर्षीय लfलाबाई खरात नामक दिव्यांग महिलेचं निर्वस्त्र अवस्थेत प्रेत आढळून आले होते.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

 बुलडाणा, 07 डिसेंबर : बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यानातर्गत खेर्डा या गावात  ५० वर्षीय लfलाबाई खरात नामक दिव्यांग महिलेचं निर्वस्त्र अवस्थेत प्रेत आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत श्वानाच्या मदतीने घरा शेजारीच राहणाऱ्या रितेश देशमुख नामक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करून कारवाईही सुरू केली आहे

जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेर्डा गावात शनिवारी सकाळच्या सुमारास एका ५० वर्षीय लिलाबाई खरात या दिव्यांग महिलेचे घरात निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आले होते. महिलेचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आलेच दिसून येत होतं. दरम्यान, घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी जळगाव पोलिसांना दिल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामकरून पोलीस श्वानाला पाचारण करण्यात आले होते.

तर दुसरीकडे, गुप्त माहिती आणि श्वानाने शेजारच्या घरात दिशा दाखविल्याने या प्रकरणी रितेश देशमुख नामक इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

त्यानंतर आरोपीच्या पत्नीने पोलीस तपासादरम्यान आपल्या पतीने रात्री लिलाबाईचा खून करून आल्याचं आपल्याला सांगितलं होतं. एवढंच नाहीतर त्याने स्वतःच्या हाताने कपडेही धुतले होते, अशी माहितीही तिने दिली.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन खुनाची आणि आरोपीला अटक केल्याची माहिती माध्यमांना दिली. आरोपीने हत्या का केली या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचं ही त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास ठाणेदार जाधव हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 06:21 PM IST

ताज्या बातम्या