Home /News /maharashtra /

लॉकडाऊनमुळे पतीनं माहेरी सोडण्यास दिला नकार, पत्नीनं दोन मुलींसह विहिरीत घेतली उडी

लॉकडाऊनमुळे पतीनं माहेरी सोडण्यास दिला नकार, पत्नीनं दोन मुलींसह विहिरीत घेतली उडी

बेबीजान यांचं कर्नाटक राज्यातील विजापूर हे माहेर आहे. बेबीजान हिला माहेरी जायचं होतं.

    सांगली, 16 एप्रिल: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका गावात विवाहितेनं तिच्या दोन चिमुरड्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला तिच्या माहेरी जायचं होतं. पण राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे पतीने माहेरी सोडण्यास नकार दिला. याच रागातून विवाहीतेने तिच्या दोन पोटच्या मुलांसह गावातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बेबीजान इब्राहिम नदाफ (वय-32), जोया इब्राहिम नदाफ (वय-5) आणि सलमान इब्राहिम नदाफ (वय-3) असे मृतांची नावं आहेत. हेही वाचा...लॉकडाउनमध्ये लग्नाची घाई पडली महागात, नवरा-नवरीची वरात थेट पोलिसांच्या दारात! याबाबत मिळालेली माहिती अशी की, जत तालुक्यातील नवाळवाडी गावात ही घटना घडली आहे. बेबीजान यांचं कर्नाटक राज्यातील विजापूर हे माहेर आहे. बेबीजान हिला माहेरी जायचं होतं. देशात लॉकडाऊन आहे. बस बंद आहेत. त्यामुळे मोटरसायकलवरुन माहेरी सोडा असा हट्ट बेबीजान हिने पतीकडे तगादा लावला होता. मात्र, सगळीकडे लॉकडाऊन असल्याने पतीने तिला विजापूरला सोडायला नकार दिला. या रागातून बेवीजान हिने पोटच्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. जत पोलिसांत या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा.. धक्कादायक! पुण्यात मृतांचा आकडा 46 वर, ससून हॉस्पिटलमध्ये आणखी दोघांचा मृत्यू यावरून झाला पती-पत्नीत वाद...? इब्राहिम नदाफ यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. नंतर त्यांनी नात्यातील बेबीजानशी 2011 मध्ये संसार थाटला. इब्राहिम मुंबईत खासगी कंपनीत वाहनचालक म्हणून काम करत होता. दोन वर्षांपासून ते नवाळवाडीत पत्नीसोबत राहत होता. दोघे शेती करत होते. गेल्या चार दिवसांपासून बेबीजान यानी पतीकडे माहेरी जाण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र, कोरोनामुळे देशात संचारबंदी आहे. थोड्या दिवसांनी सोडून देतो असे इब्राहिमने पत्नीला सांगितलं पण ती ऐकायला तयार नव्हती. यावरून पती-पत्नीमध्ये बुधवारी रात्री वाद झाला. गुरुवारी सकाळी बेबाजान आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन गावातील एका विहिरीजवळ गेली आणि तिने मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. संपादन- संदीप पारोळेकर
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या