Home /News /maharashtra /

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीला जिवंत जाळलं, विकृती पतीला अटक!

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीला जिवंत जाळलं, विकृती पतीला अटक!

पत्नीने तात्काळ अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न करीत तीने घटनास्थळावरुन पळ काढला पण यात ती होरपळून भाजली...

पत्नीने तात्काळ अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न करीत तीने घटनास्थळावरुन पळ काढला पण यात ती होरपळून भाजली...

पत्नीने तात्काळ अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न करीत तीने घटनास्थळावरुन पळ काढला पण यात ती होरपळून भाजली...

भिवंडी, 25 सप्टेंबर :  दारू (alcohol ) पिण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून (burnt ) तिला ठार मारल्याची  धक्कादायक घटना भिवंडीमध्ये (bhiwandi) घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस (shantinagar police station bhiwandi) ठाण्यात आरोपी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना भिवंडीतील शांतीनगर परिसरात घडली आहे. फिरोज शेख असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे. तर रुखसाना असं होरपळून मृत्यू झालेल्या पत्नीचे  नाव आहे. आरोपी फिरोज रुखसाना यांचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हापासून तो पत्नीसह राहतो. काही महिन्यांपासून त्याला दारूचं व्यसन जडलं होतं. त्यातच आरोपी फिरोज याने गुरुवारी आपल्या पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी केली होती. Explainer: भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्रामुळे चीनची का वाढली धाकधूक? वाचा मात्र त्यावेळी पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या फिरोज याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी रुकसानाने तात्काळ अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न करीत तीने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, या घटनेत ती गंभीर होरपळून भाजली असून तिला  इतर नातेवाईकाच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात, राज्यात 3 ते 4 दिवस पावसाचा इशारा मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.  दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.  या गुन्ह्याचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Bhiwandi

पुढील बातम्या