Home /News /maharashtra /

रात्रभर मारल्या चकरा अन् पहाटे पाडला रक्ताचा सडा; झोपल्या जागीच पत्नीचा खेळ खल्लास

रात्रभर मारल्या चकरा अन् पहाटे पाडला रक्ताचा सडा; झोपल्या जागीच पत्नीचा खेळ खल्लास

Murder in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा याठिकाणी एका व्यक्तीनं भल्या पहाटे साखर झोपेत असणाऱ्या आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife brutal murder by husband) केली आहे.

    बुलडाणा, 11 डिसेंबर: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील साखरखेर्डा (Sakharkherda) याठिकाणी एका व्यक्तीनं भल्या पहाटे साखर झोपेत असणाऱ्या आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife brutal murder by husband) केली आहे. आरोपी पतीने मसाला तयार करण्याचा दगडी पाटा डोक्यात घालून (Crushed head with stone) पत्नीचा खेळ खल्लास केला आहे. बापाचा प्रताप पाहून आईच्या बाजूला झोपलेल्या मुलीचा देखील थरकाप उडाला आहे. भल्या पहाटे तिने आरडाओरड केल्याने आसपासचे लोकं मदतीला धावले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आरोपी पतीला अटक (Accused husband arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संजय पांडुरंग गवई असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी संजय गवई हा साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक 5 मध्ये पत्नी सुनिता आणि तीन मुलांसह वास्तव्याला आहे. आरोपी संजयला पत्नी सुनिता यांच्यावर चारित्र्याचा संशय होता. यातूनच आरोपीनं आपल्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी आरोपीनं संपूर्ण रात्र जागून काढली. रात्रभर तो घरात इकडे तिकडे चकरा मारत होता. हेही वाचा-कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं बोलावलं अन्..; कोल्हापुरात CAकडून महिलेवर रेप दरम्यान आरोपीची बारावीत शिकणारी मुलगी घरातील सर्वजण झोपल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करत होती. यावेळी तिने आपल्या वडिलांना हटकलं आणि झोपण्यास सांगितलं. पण वडिलांनी 'मला झोप येत नाहीये, तू झोप' असं सांगितलं. अभ्यास करून झाल्यानंतर मुलगी झोपी गेली. पण आरोपी रात्रभर जागा राहिला. पहाटे साडेचारच्या सुमारास आरोपीचा मुलगा व्यायाम करण्यासाठी घराबाहेर निघून गेला. यावेळी पत्नी सुनीता आणि लेक एकमेकांशेजारी झोपले होते. याची संधी साधत संजय याने घरातील दगडी पाटा उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. हेही वाचा-कोल्हापुरात अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; गळफास घेत केला जीवनाचा शेवट हा हल्ला इतका भयंकर होता की घरात हाडामांसाचे तुकडे आणि रक्ताचा सडा पडला. घरातील हे चित्र पाहून मुलगी जीवाच्या आकांताने ओरडू लागली. भल्या पहाटे मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील लोकं मदतीला धावले. आरोपीनं पत्नीची केलेली अवस्था पाहून त्यांनाही धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Buldhana news, Crime news, Murder

    पुढील बातम्या