मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पत्नी अन् मुलीनेच रचला कट; सुपारी देऊन पोलीस कर्मचाऱ्याचा केला गेम

पत्नी अन् मुलीनेच रचला कट; सुपारी देऊन पोलीस कर्मचाऱ्याचा केला गेम

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

पत्नी आणि मुलीनेच (Wife and daughter) कट रचून एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या (Police Constable Murder) घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि मुलीला अटक केली आहे.

गडचिरोली, 17 जुलै: पत्नी आणि मुलीनेच (Wife and daughter) कट रचून एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या (Police Constable Murder) घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि मुलीसह अन्य एका संशयित आरोपीला अटक केली आहे. हत्येची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं हाती घेतले. तपास करत असताना हत्येचे धागेदोरे मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि मुलीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. आरोपी मायलेकींनी सुपारी देऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची हत्या घडवून आणल्याची बाब चौकशीतून समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

संबंधित घटना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील धोडराज येथील आहे. तर जगन्नाथ सिडाम असं हत्या झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. 4 जुलै रोजी मध्यरात्री मृत पोलीस हवालदार नागेपल्ली याठिकाणी आपल्या निवास्थानी असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांची हत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. अहेरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांनी या हत्याकांडाचा तपास आपल्या हाती घेतला. अवघ्या काही दिवसांतच हत्येचा उलगडा केला आहे.

हेही वाचा-मुलीनं वडिलांना दिल्या झोपेच्या गोळ्या,मायलेकीने दांडक्यांनी मारून केली हत्या

या प्रकरणाचा तपास सुरू असताना, संबंधित हत्याकांडात मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा आणि मुलीचा हात असल्याची माहिती उघड झाली आहे. आरोपी मायलेकींनी सुपारी किलरद्वारे सिडाम यांची हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपास स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतकाची पत्नी, मुलगी आणि एका आरोपीला अटक केली आहे. या हत्याकांडात अन्य दोन आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा-दुहेरी हत्याकांडानं हादरलं पुणे; हॉटेल मालकानं केलेल्या हत्येनं खळबळ

मायलेकींनी पोलीस हवालदार जगन्नाथ सिडाम यांची हत्या कोणत्या कारणातून घडवून आणली आहे, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Gadchiroli, Murder