Home /News /maharashtra /

जालना हादरलं! विधवा सूनेचं प्रेमप्रकरण समजताच सासऱ्यानं तिच्यासह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं

जालना हादरलं! विधवा सूनेचं प्रेमप्रकरण समजताच सासऱ्यानं तिच्यासह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं

विधवा सूनेचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर सासरा आणि दिरानं रागातून घडवून आणलं हत्याकांड

जालना, 30 ऑक्टोबर: अनैतिक संबंधातून विधवा सूनेसह तिच्या प्रियकराची ट्रॅक्टरनं चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी महिलेचा सासरा आणि दीराला पोलिसांनी अटक केली आहे. मारिया लालझरे आणि हरबक भागवत अशी मृतांची नावं आहे. चपळगाव (जि.जालना) येथे घडलेल्या या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी बथवेल लालझरे आणि विकास लालझरे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हेही वाचा...डोली उठण्याआधी निघाली वडिलांची अंत्ययात्रा, धाकट्या मुलीनं दिला मुखाग्नी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विधवा सूनेचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर सासरा आणि दिरानं रागातून हे हत्याकांड घडवून आणलं आहे. बथवेल लालझरे हा मारियाचा सासरा तर विकास हा तिचा दीर आहे. अंबडचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी सांगितलं की, दोन्हा आरोपींना अटक केली आहे. मृत मारियाच्या पतीचं 10 वर्षांपूर्वी निधन झालं. त्यानंतर ती सासू-सासऱ्यांकडे राहत होती. दरम्यान, मारियाचे गावातीलच हरबक भागवतसोबत प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे हरबक भागवत हा देखील वैवाहिक होता. मात्र, मारिया आणि भागवत यांच्या प्रेमसंबंधाला नातेवाईकांचा विरोध होता. मारियापासून दूर राहा, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी घमकी आरोपींनी भागवत याला आधीच दिली होता. याबाबत हरबक भागवत याने अंबड पोलीस स्टेशनमध्ये मारियाचे सासरे आणि दीराविरोधात तक्रारही दिली होती. दरम्यान, 30 मार्च रोजी भागवत आणि मारिया गुजरात राज्यात पळून गेले होते. याबाबत मारियाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मारिया आणि भागवतचा शोध घेऊन त्यांना परत गावात आणलं. त्यानंतर मारिया आणि भागवत गावात एकत्र राहात होते. मात्र, 28 ऑक्टोबरला मारिया आणि भागवत दुचारीवरून शेतात जात असताना आरोपी विलास लालझरे यानं मारिया आणि भागवतच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडून ठार मारल्याचा आरोप हरबक भागवतच्या पत्नीनं केला आहे. हेही वाचा...उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार? काय म्हणाले संजय राऊत याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास लालझरे आणि त्याचे वडील बथवेल लालझरेला अटक केली आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या