मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पतीच्या मृत्यूनंतर FBवरील तरुणानं दाखवली सुखी संसाराची स्वप्न पण..; बीडला हादरवणारी घटना

पतीच्या मृत्यूनंतर FBवरील तरुणानं दाखवली सुखी संसाराची स्वप्न पण..; बीडला हादरवणारी घटना

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Rape in Beed: बीडमधील एका तरुणानं फेसबुकवरील ओळखीतून विधवा महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (Love trap) ओढून तिच्यावर वारंवार बळजबरीनं शारीरिक संबंध (Rape on widow) प्रस्थापित केले आहेत.

  • Published by:  News18 Desk

बीड, 27 नोव्हेंबर: बीड (Beed) शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विधवा महिलेवर अत्याचार (Rape on widow) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर, विधवा महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (Love trap) ओढून तिच्यावर वारंवार बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. पीडित महिलेनं लग्नाबाबत विचारलं असता, आरोपीनं टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित महिलेनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बलात्कारासह फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सम्राट गीते असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव असून तो परळीतील रहिवासी आहे. तर 35 वर्षीय पीडित विधवा महिला बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. तसेच तिला एक दहा वर्षांचा मुलगा देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी पीडित महिलेची फेसबुकवर संशयित आरोपी सम्राट गीते याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावरील संवादातून त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं.

हेही वाचा-आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य; चिठ्ठी लिहून शिक्षकाकडे मागितली मदत

अलीकडेच सहा महिन्यांपूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. त्यांच्या भेटीगाठी देखील झाल्या. मागील सहा महिन्याच्या कालावधी आरोपी सम्राट गीते यानं पीडित महिलेला विविध ठिकाणी घेऊन जात, तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष (Lure of marriage) दाखवून बीड-परळी मार्गावरील एका हॉटेलात नेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे.

हेही वाचा-सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन्..; शिक्षकानं मुलीला दिली आयुष्यभराची जखम

दरम्यान, पीडित महिलेनं आरोपीला लग्नाबाबत विचारलं असता, त्यानं टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच चार दिवस मोबाइल बंद ठेवून आरोपीनं पीडितेशी संपर्क देखील तोडला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित महिलेनं बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित गुन्ह्याचं घटनास्थळ पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने या गुन्हा पिंपळनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news, Rape