मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रेमडेसीवीरचा तुटवडा का? बाळासाहेब थोरातांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा गोंधळ, LIVE VIDEO

रेमडेसीवीरचा तुटवडा का? बाळासाहेब थोरातांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा गोंधळ, LIVE VIDEO

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकोले तालुक्यात कोरोना आढावा बैठक बोलावली होती.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकोले तालुक्यात कोरोना आढावा बैठक बोलावली होती.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकोले तालुक्यात कोरोना आढावा बैठक बोलावली होती.

अकोले, 18 एप्रिल : राज्यात कोरोनाची ( Maharashtra Corona Cases) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्यामुळे सर्वत्र तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कोरोना आढावा बैठकीतच राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्याने रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकोले तालुक्यात कोरोना आढावा बैठक बोलावली होती.  अकोले तालुक्यातील पंचायत समिती सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.  यावेळी राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी थेट बाळासाहेब थोरात यांनाच जाब विचारला.  'रेमडेसीवीर इंजेक्शन अकोले तालुक्याला का कमी मिळतात असा अन्याय का? असा सवालच मालुंजकर यांनी उपस्थितीत केला.

'तालुक्यात इतकी बिकट अवस्था आहे, नीट आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाही', असं म्हणत तक्रारीचा पाढाच मालुंजकर यांनी वाचला. त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. बैठकीतील इतर कार्यकर्त्यांनी मालुंजकर यांना खाली बसण्यास सांगितले. पण, तरीही मालुंजकर प्रश्न विचारतच होते.

IPL 2021 : पाच वेळच्या चॅम्पियन मुंबईचा खडतर प्रवास, 7 वर्षातली वाईट कामगिरी

त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी 'आम्हाला वेदना समजत नाही का? माणूस एकूण घेतो म्हणजे कसं ही बोलायचं हे योग्य नाही' असं म्हणत चांगलेच खडेबोल सुनावले. गोंधळ वाढल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला बाहेर काढण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Balasaheb thorat, Congress