• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • लोकांच्या चिता जळल्या म्हणून 100 कोटी लशीचा उत्सव का? नाना पटोलेंचा मोदी सरकारला सवाल

लोकांच्या चिता जळल्या म्हणून 100 कोटी लशीचा उत्सव का? नाना पटोलेंचा मोदी सरकारला सवाल

'जर आज आपण जागे झालो नाहीतर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान ही संपेल आणि आपले स्वातंत्र्य ही संपेल'

'जर आज आपण जागे झालो नाहीतर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान ही संपेल आणि आपले स्वातंत्र्य ही संपेल'

'जर आज आपण जागे झालो नाहीतर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान ही संपेल आणि आपले स्वातंत्र्य ही संपेल'

  • Share this:
बीड, 25 ऑक्टोबर :' मोदी सरकार (Modi government ) 100 कोटी लसीचा उत्सव ( celebration of 100 crore vaccines ) साजरा करत आहेत, कशासाठी हा उत्सव कोरोना काळात तरुण मुलं मेली, आमच्या बहिणीचे कुंकू पुसलं, शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार? असा परखड सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी उपस्थित केला आहे. बीडमध्ये काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला. 'ज्या पद्धतीने थोतांड तुम्ही या देशात निर्माण केलं,गरिबाच्या घरचे दिवे विझून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केला, याचा विरोध कॉंग्रेस करेल. डिझेल,पेट्रोलचे दर वाढवायची गरज नसताना ही दरवाढ केंद्र सरकार करत आहे. तुम्हाला लुटायच काम केंद्र सरकार करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. मानसी नाईकच्या Karwa Chauth स्पेशल फोटोवर 'या' व्यक्तीची खास कमेंट 'कोरोना काळात फुकट लस दिली म्हणून  पेट्रोल डिझेल वाढवले त्यात 80 टक्के लोकांनी लस विकत घेतली 20 टक्के लोकांना फुकट दिली. पण 100 कोटी लसीचा उत्सव साजरा करत आहेत, कशासाठी हा उत्सव कोरोना काळात तरुण मुलं मेली, आमच्या बहिणीचे कुंकू पुसलं, शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार? असा सवाल पटोलेंनी उपस्थितीत केला. जीएसटी आला, सर्व सामान्य लोकांकडून टॅक्स वसुली सुरू झाली. मोठ्यांकडे पैसा गेला पाहिजे, अशी व्यवस्था जीएसटीने केली. राज्याच्या तिजोरीत काहीच पैसा जात नाही. जो मुख्य उत्पादक आहे त्याच्या खात्यात पैसे जातात. त्याचा पुरावा लक्षात येईल कोरोना काळात अनेक उद्योग बंद झाले. त्यामुळे अनेक रोजगार गेले, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. वाढलेली दाढी, लाल डोळे, चिंतित चेहरा; शाहरुखच्या व्हायरल फोटोमागचं सत्य.. 'केंद्रामधील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्यांना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू म्हणून ही लढाई एकट्या नाना पटोलेची नाही. जर आज आपण जागे झालो नाहीतर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान ही संपेल आणि आपले स्वातंत्र्य ही संपेल, असंही पटोले म्हणाले.
Published by:sachin Salve
First published: