तूर बंदीदरम्यान शिवसेना गप्प का?

तूर बंदीदरम्यान शिवसेना गप्प का?

शिवसेनेने आज सामनातून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

02 मे :  शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आणि शिवसेना पुन्हा आक्रमक झाले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं अशी विरोधी पक्षांकडून राज्यपालांकडे मागणी केली आहे. विरोधी पक्षातले नेत्यांनी आज सकाळी राजभवनत राज्यपालांची भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे विरोधकांपाठोपाठ आता शिवसेनेनेही विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

तूर खरेदी संदर्भात शिवसेनेने आवाज उठवला आहे. शिवसेनेने आज सामनातून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

खरंतर गेल्या 10 एप्रिलच्या एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावल्यापासून शिवसेना काहीशी गप्पच होती. राज्यात एवढी तूर कोंडी झाली असतानाही शिवसेनेनं साधं आंदोलनही केलं नव्हतं. पण राज्यात तूर खरेदी घोटाळा झाल्याचं उघडकीस येताच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

तसंच तुरीच्या प्रश्नावर शिवसेना आमदार मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गेले आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना आमदारांमध्ये तूर खरेदीसंदर्भात चर्चा सुरु आहे. पण मुळ्यात शिवसेनेला शेतकऱ्यांबद्दल अचानक जाग का आली असा प्रश्न उपस्थित होतो. कर्जमाफीचा मुद्दा असो किंवा शेतमाला मिळत नसलेल्या भावामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशात सरकारमध्ये असलेली शिवसेना इतके दिवस गप्प का होती. विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेतही शिवसेना कुठेही दिसली नाही. पण उशिरा का होईना सेनेला जाग आली असं म्हणता येईल.

First published: May 2, 2017, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading