मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राऊतांना अटक, पण शरद पवार शांत, 'संजय'नी सांगितला मौनाचा अर्थ!

राऊतांना अटक, पण शरद पवार शांत, 'संजय'नी सांगितला मौनाचा अर्थ!

संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे, यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑगस्ट : संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे, यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मुख्य म्हणजे काही महिन्यांपूर्वीच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी संजय राऊत यांची संपत्ती इडीने जप्त केल्याचा मुद्दा पंतप्रधानांपुढे मांडला. त्यावेळी अनिल देशमुख आणि नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या नेत्यांना इडीने अटक केलेली असतानाही पवार यांनी फक्त संजय राऊत यांच्याबाबतच पंतप्रधानांशी चर्चा का केली? असा प्रश्न तेव्हाही उपस्थित करण्यात आला होता.

6 एप्रिल 2022 ला पंतप्रधानांच्या भेटीत संजय राऊतांविरुद्धच्या कारवाईवर बोलणारे शरद पवार आता काहीच का बोलले नाहीत? याबाबत एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'शरद पवारांनी संजय राऊतांचा वापर केला आता त्यांच्या नजरेत राऊतांची उपयुक्तता संपली आहे. या कारणामुळे संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया आलेली नाही. संजय राऊतांना आता त्यांची किंमत कळेल. ज्यासाठी संजय राऊत यांनी शिवसेनेला नष्ट केलं, शिवसेनेला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली होती, आता ते त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत,' असं संजय शिरसाट म्हणाले.

'संजय राऊत शरद पवारांचे मोहरे होते. या मोहऱ्याचं काम आता संपलं आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानेही हे मान्य केलं आहे, त्यामुळे ते यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत. शरद पवारांच्या इशाऱ्यावरच संजय राऊत यांनी शिवसेना तोडण्याचं काम केलं,' असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

'संजय राऊत शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. राऊतांनी कायमच राष्ट्रवादीची मदत केली, त्यामुळे आता त्यांच्यामागे शिवसेनेचा कोणताही नेता उभा राहणार नाही,' अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.

'शरद पवार आपला पक्ष वाढवण्याचं काम इमानदारीने करतात. पवारांनी हे पाऊल आपल्या पक्षाला मोठं करण्यासाठी उचललं होतं. शिवसेना तोडण्यात पवारांना यश आलं. शिवसेना तुटल्याचा सर्वाधिक आनंद शरद पवार यांना झाला असेल,' असं वक्तव्यही संजय शिरसाट यांनी केलं.

First published:

Tags: Sanjay raut, Shivsena, शरद पवार. sharad pawar