कांद्यामुळे सप्टेंबरमध्येच का येतं डोळ्यात पाणी?

कांद्यामुळे सप्टेंबरमध्येच का येतं डोळ्यात पाणी?

कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. नेहमीच ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांत कांद्याच्या दरांमुळे लोक हैराण होतात. यावर्षी तर कांदा 80 ते 90 रुपये किलोवर गेला.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. नेहमीच ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांत कांद्याच्या दरांमुळे लोक हैराण होतात. यावर्षी तर कांदा 80 ते 90 रुपये किलोवर गेला.

मार्च आणि एप्रिलमध्ये कांदा तयार होऊन बाजारात यायला सुरुवात झाली होती. कांद्याची साठवण करण्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. उन्हाळ्यामध्ये कांद्याची आवक वाढल्यामुळे भाव कमी होतात.पावसाळ्यात मात्र या साठवण केंद्रांमधून कांद्याचा पुरवठा केला जातो पण साठवणुकीची व्यवस्था चांगली नसल्याने हा कांदा सडतो.

कांद्याची आवक कमी

प्रत्येक पावसाळ्याच्या हंगामानुसार कांद्याचं किती पीक येईल ते ठरतं. मागच्या काही वर्षांतले आकडे पाहिले तर लक्षात येतं, कांद्याचं उत्पादन अनियमित झालं आहे. 2015 मध्ये 38 लाख क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक होती. 2016 मध्ये ती 65 लाख क्विंटलपेक्षा जास्त झाली. मागच्या वर्षी 2018 मध्ये 60 लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. पण यावर्षी सप्टेंबरपर्यंत 31 लाख क्टिंटलची आवक झाली. म्हणजेच यावर्षी कांद्याची आवक अर्ध्यावर आली. कांद्याचा पुरवठा कमी झाला की भाव वाढतात.

निवडणुकीच्या आधी EDचा दणका, शरद पवार आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल!

यावर्षी पावसामुळे कांद्याचं पीक हाती यायला उशीर झाला. हवामान बदलामुळे कांद्याच्या पीक वेळापत्रकातही बदल झाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये कांद्याच्या पेरणीमध्ये अडचणी येतील, अशी शक्यता आहे. पुन्हा मार्च आणि एप्रिल महिन्यात कांद्याचं पीक तयार होईल.

कधी आयात, कधी निर्यात

कांद्याचा पुरवठा कमी झाल्यामुळे सरकारने कांद्याचं निर्यातशुल्क वाढवलं आहे. त्याचवेळी चीन,अफगाणिस्तान, इजिप्त अशा देशांमधून कांदा आयात करण्याचाही सरकार विचार करतंय. 2017 मध्ये भारत एप्रिल ते जुलै महिन्यात कांद्याची निर्यात करत होतं आणि त्याच वेळी सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात दुसऱ्या देशातून कांदा आयात केला जात होता.

पावसाळा संपतासंपता कांद्याचे भाव वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे कांद्याची साठेबाजी. जेव्हा मागणी वाढते तेव्हा कांदा बाजारात आणला जातो. आता घाऊक बाजारात कांद्याचे दर 48 रुपये प्रतिकिलो झाल्यानंतर बेकायदेशीर साठेबाजीविरोधात सरकार पावलं उचलणार आहे. सरकारकडे असलेल्या कांद्याचा साठा 56 हजारांवरून 16 हजार टनावर आला आहे.

=====================================================================================

VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली 'ही' घोषणा

Published by: Arti Kulkarni
First published: September 24, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading