Home /News /maharashtra /

अजित पवार यांच्यावर इतक्यातच हकालपट्टीची कारवाई होणार नाही; ही 3 आहेत कारणं

अजित पवार यांच्यावर इतक्यातच हकालपट्टीची कारवाई होणार नाही; ही 3 आहेत कारणं

अजित पवार यांनी भाजपबरोबर संधान साधून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडखोरीबद्दल आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करतो याविषयी उत्सुकता होती. पण शरद पवार कठोर कारवाई इतक्यातच करणार नाहीत. ही आहेत 3 कारणं...

  मुंबई, 23 नोव्हेंबर : अजित पवार यांनी भाजपबरोबर संधान साधून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडखोरीबद्दल आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करतो याविषयी उत्सुकता होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. अजित पवार अजूही पक्षात आहेत. त्यांची आमदारकीही कायम आहे. अजित पवार यांच्यावर पुढील कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत. अजित पवार यांनी केलेल्या बंडनंतरही ते पक्षात कायम आहेत. त्यांच्यावर किमान बहुमत चाचणीपर्यंत कारवाई होणार नाही. त्यामागे ही आहेत 3 कारणं.. 1)  पक्षाने हकालपट्टी केली तरी त्यांची आमदारकी कायम राहते.  त्यामुळे पक्षातून हकालपट्टी करून काही साधणार नाही. 2) हकालपट्टी न केल्याने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. म्हणून पक्षानं व्हीप काढला तर तो अजित पवार यांच्यावर बंधनकारक राहतो. अजित पवार यांनी व्हीपच्या विरोधात मतदान केलं, तर मात्र त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. 3)  शरद पवार यांनी कुठलीही कडक कारवाई न करता अजित पवार यांच्यासाठी परतीचा मार्ग ठेवला आहे. अजित पवार यांनी आपल्याच पक्षातील आमदार फोडून भाजपला मदत केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. संबंधित -  राष्ट्रवादीची अजित पवारांवर मोठी कारवाई, आता सर्व अधिकार या नेत्याकडे अजित पवारांच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. अखेर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अजित पवारांवर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आमदारांना व्हीप जारी करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. परंतु, ते अजून पक्षात आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची याचे सर्व अधिकार शरद पवार यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या पुतण्यावर शरद पवार काय कारवाई करता हे पाहण्याचं ठरणार आहे. --------------------- अन्य बातम्या राष्ट्रवादीचे अजून इतके आमदार गायब, मोठ्या नेत्याने केलं स्पष्ट राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांसह 17 आमदार गायब
   
  Published by:Arundhati Ranade Joshi
  First published:

  Tags: Ajit Pawar (Politician), Maharashtra Assembly Election 2019, Maharashtra government, Sharad Pawar (Politician)

  पुढील बातम्या